जालना : जालना विधानसभा मतदारसंघातील इंदेवाडी येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुन खोतकर यांचा प्रचार दौरा झाला. याप्रसंगी परिसरातील सर्व लोकांना अर्जुन खोतकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अरविंद चव्हाण यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
खोतकर यांनी विविध विषयांवर चर्चा केली तसेच जालना विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामीण व शहरी भागाचा विकास आराखडा लोकांसमोर मांडला. त्याचबरोबर आपण विशेष प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 300 ते 400 कोटी रुपये निधी हा जालना विधानसभा मतदारसंघाच्या विकास कामासाठी आणला आहे. जालना विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी सर्वांगीण विकास साधला व पुढील काळात आपण साधणार आहोत, असे खोतकर म्हणाले.
भविष्यात जालना मतदारसंघास समृद्ध आणि संपन्न बनविण्यासाठी मी विकास आराखडा बनविला आहे! पाच वर्षात थांबलेल्या विकासाची पोकळी भरून काढायची व जालना मतदारसंघाला पुन्हा एकदा विकासाच्या नव्या उंचीवर न्यायचे आहे, असे ते म्हणाले.
अर्जुन खोतकर एक खंबीर नेतृत्व आहे व जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता त्यांचे असणारी धडपड ही मी जवळून बघितली आहे. त्यामुळे आपण सर्व जालनाकरांनी खोतकर यांना आमदार म्हणून निवडून द्यायचे आहे. निवडून आल्यावर तुमच्याच आशीर्वादाने ते लवकर कॅबिनेट मंत्री सुद्धा होणार आहेत. जालना विधानसभा मतदारसंघातील आपल्या हक्काचा माणूस मंत्रालयामध्ये बसलेला आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपण सर्वजण निर्धार करूया आणि अर्जुन खोतकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करू आणि जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावू, असे आवाहन अरविंद चव्हाण यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित शिवसेना,युवासेना, प्रमुख पदाधिकारी, स्थानिक शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तसेच सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.