Arjun Khotkar On Anjali Damania : माझ्यावरील आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत, ईडी चौकशी झाली, आता कोणती चौकशी करणार!

Arjun Khotkar comments on the ED investigation into the Ramnagar factory purchase deal, raising questions about further investigations. : वैयक्तिक फायद्यासाठी खोतकर यांनी नियोजित जालना- नांदेड समृद्धी महामार्गाचा रस्ता रामनगर साखर कारखान्यातील आपल्या जागेतून वळवला, असा आरोप दमानिया यांनी केला होता.
Anjali Damania-Arjun Khotkar News
Anjali Damania-Arjun Khotkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna Political News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकताच जालना दौरा केला. या दौऱ्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची अंतरवालीत भेट घेतल्यानंतर दमानिया यांनी शिवसेनेचे आमदार माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी खरेदी केलेल्या रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणात आपण त्यांच्याविरोधात लढा देणार आहोत, असे जाहीर केले.

वैयक्तिक फायद्यासाठी खोतकर यांनी नियोजित (Jalna) जालना- नांदेड समृद्धी महामार्गाचा रस्ता रामनगर साखर कारखान्यातील आपल्या जागेतून वळवला, असा आरोप दमानिया यांनी केला होता. यावर अर्जुन खोतकर यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावरील आरोप म्हणजे शेळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे. यापुढे आणखी कोणती चौकशी करणार? असा सवाल खोतकर यांनी केला.

अंजली दमानिया (Anjali Damania) यांना स्वत: आपण किंवा आपल्या वतीने प्रतिनिधी भेटून प्रकरणाची दुसरी मांडू, असेही खोतकर यांनी स्पष्ट केले. अर्जुन शुगर इंडस्ट्रीमध्ये आपले सात टक्के म्हणजे 69 लाख रूपये भाग भांडवल आहे. न्यायालयीन बाबीमुळे बँक हा कारखाना सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्य करत नाही. या खरेदी व्यवहारात अर्जुन शुगर इंडस्ट्री दुसरा खरेदीदार आहे.

Anjali Damania-Arjun Khotkar News
Anjali Damania-Arjun Khotkar : शिवसेनेचा 'अर्जुन' संकटात! रामनगर कारखान्याचे प्रकरण दमानियांनी पुन्हा काढले

कारखान्याच्या खरेदी व्यवहाराच्या अनुषंगाने ईडीने चौकशी केली आहे. शिवाय अंजली दमानिया म्हणतील, तेव्हा आपण आपल्या जागेतून रस्ता देऊ नका, असे पत्र देण्यास तयार आहोत. त्यांनी हा रस्ता रद्द करून आणावा, असे आव्हान अर्जुन खोतकर यांनी अंजली दमानिया यांना दिले आहे. कुठलाही कारखाना विकत घेताना त्याच्यावरील दायत्वाची जबाबदारी खरेदी करणाऱ्याला घ्यावी लागते. कामगार आणि शेतकऱ्यांच्या देण्यांचा विचार करावा लागतो.

Anjali Damania-Arjun Khotkar News
Anjali Damania Meet Manoj Jarange: मराठवाड्यातली सर्वात मोठी घडामोड, अंजली दमानिया अचानक जरांगेंच्या अंतरवालीत,धनंजय देशमुखही सोबत...

108 कोटींची देणी थकवून झालेल्या कारखान्याच्या खरेदीमध्ये घोटाळा झाला आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा पीएफ, पगार थकलेला आहे. सभासद शेतकऱ्यांची देणी शिल्लक आहेत. ही सगळी मंडळी आपली फसवणूक झाल्याच्या भावनेतून न्याय मागत आहे. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एप्रिल अखेरीस या विरोधात लढा देणार आहोत, असा इशारा अंजली दमानिया यांनी दोन दिवसांपूर्वी दिला आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com