Ashok Chavan-Madhav Kinhalkar : कट्टर विरोधक अशोक चव्हाण - किन्हाळकर तब्बल 25 वर्षांनी एकाच व्यासपीठावर

Nanded BJP News : 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना डॉक्टरांनी आव्हान दिले. पण डॉक्टरांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.
Ashok Chavan-Madhav Kinhalkar
Ashok Chavan-Madhav Kinhalkarsarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : नांदेड जिल्ह्यातून एकाचवेळी राज्यमंत्री झालेले आणि पूर्वीश्रमीचे चांगले मित्र अशोक चव्हाण आणि डॉ. माधव किन्हाळकर यांच्यात कटुता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी आपले वेगवेगळे राजकीय मार्ग अवलंबले होते. आता अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाऊन खासदार झाले आहेत. आता हे दोन्ही नेते गेल्या अडीच दशकांची राजकीय कटुता आणि त्यातून झालेल्या व महाराष्ट्रभर गाजलेल्या कायदेशीर लढाईनंतर तब्बल 25 वर्षांनी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. Ashok Chavan-Madhav Kinhalkar

अशोक चव्हाण (Ashok Chavan) 1987 मध्ये राजकीय पदार्पणातच नांदेडचे खासदार झाले. तर डॉ.किन्हाळकर 1990 ला वयाच्या 32 व्या वर्षी भोकर मतदारसंघातून विधानसभेमध्ये दाखल झाले. त्याआधी 1989 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या चव्हाण यांना 1992 मध्ये राज्य विधानपरिषदेत संधी मिळाली आणि त्यानंतर हे दोघेही 1993 मध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. पण 1999 ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर डॉ. किन्हाळकर त्या पक्षामध्ये गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan-Madhav Kinhalkar
Nashik Politics : नाशिकवर भाजपच्या दाव्याने शिंदे गट आक्रमक; पदाधिकाऱ्यांचा थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच इशारा

भोकर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना डॉक्टरांनी आव्हान दिले. पण डॉक्टरांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. ‘पेडन्यूज’ आणि निवडणूक खर्चाच्या प्रकरणातील कायदेशीर लढाईमध्ये किन्हाळकर (Madhav Kinhalkar) यांनी चव्हाणांना चांगलेच कोंडीत पकडले होते. त्यातून त्यांच्यात व्यक्तिगत आणि राजकीय या दोन्ही पातळ्यांवर कटुता निर्माण झाली होती.

Ashok Chavan-Madhav Kinhalkar
Pankaja Munde On Manoj Jarange : पंकजा मुंडेंनी केलं जरांगे पाटलांचं अभिनंदन; काय आहे कारण?

भारतीय जनता पक्षात (BJP) किन्हाळकरांनी प्रवेश केला व त्यांनी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अमिता चव्हाण यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. यात किन्हाळकांचा पराभव झाला होता. गेल्या महिन्यात अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला. नांदेड जिल्हा शतप्रतिशत भाजप करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मागची सर्व कटुता विसरून भाजपातील जुन्या व नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समन्वय रहावा यासाठी मेळावे घेण्यात येत आहेत.

भोकर (Bhokar) विधानसभा मतदारसंघातील मुदखेड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या व्यासपीठावर अशोक चव्हाण, चिखलीकर, डॉ. किन्हाळकर हे तिन्ही नेते उपस्थित होते. भोकर विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना 85 हजार मते मिळाली होती.

आता हे दोन्ही नेते एकाच पक्षात आहेत. शिवाय या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले डॉ. माधवराव किन्हाळकर यांची त्यांना साथ मिळणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून चिखलीकरांना मोठ्या मताधिक्यची अपेक्षा आहे. एकूणच अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना आपल्या पूर्वाश्रमीच्या विरोधकांशी जुळवून घ्यावे लागत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ashok Chavan-Madhav Kinhalkar
Manoj Jarange Patil News : निवडणुकीत इंटरेस्ट नाही, पण...; लोकसभेसाठी जरांगेंचे मराठा समाजाला दोन पर्याय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com