Ashok Chavan : रामनामाचा आधार घेत टीका, अशोक चव्हाणांवर हिंदू मतदार नाराज?

Ayodhya Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अशोक चव्हाणांची भाजपवर केलेली टीका ठरणार त्रासदायक
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News :

अयोध्येत 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाला. या निमित्ताने काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपला चिमटे काढणारी पोस्टरबाजी केली होती.

या पोस्टरबाजीची राज्यात चर्चा झाली. त्यावरील अशोक चव्हाण यांच्या नावाला काळे फासण्यात आले. परंतु एवढ्यावर हा विषय थांबेल असे वाटत नाही, कारण अशोक चव्हाण यांच्या या बॅनरबाजीचे साईड इफेक्ट येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दिसण्याची दाट शक्यता आहे.

Ashok Chavan News
Imtiaz Jaleel : 'तुमचा उत्सव संपला असेल, तर...' ; इम्तियाज जलील यांचं पंतप्रधान मोदींना उद्देशून विधान!

अशोक चव्हाण यांच्यावर हिंदुत्ववादी मतदार नाराज झाल्याची चर्चा आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याच्या शुभेच्छा द्यायच्याच होत्या, तर उपदेश कशाला केला? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

अयोध्येतील सोहळ्याला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पण या सोहळ्याला भाजपने राजकीय स्वरुप दिल्याची टीका करत काँग्रेसने सहभागी होण्यास नकार दिला होता.

अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या धोरणाला साजेशी भूमिका घेत नांदेडमध्ये अयोध्येतील सोहळ्याबद्दल शहरासह ग्रामीण भागात काही पोस्टर लावून भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांनी भाजपला उपदेश करणारे संदेश या पोस्टरवर ठळकपणे नमूद करत सुनावले होते. रामभक्तांना मात्र चव्हाणांची ही पोस्टरबाजी काही रुचली नाही. अनेकांनी याबद्दल नाराजीचा सूर लावला, तर काही ठिकाणी या फलकावर असलेल्या अशोक चव्हाणांच्या नावाला काळे फासत संताप व्यक्त केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपवर निशाणा साधण्याच्या प्रयत्नात अशोक चव्हाण हेच हिंदू मतदारांच्या निशाण्यावर आता आले आहेत. सोशल मिडियामधूनही अशोक चव्हाण यांच्यावर या पोस्टरबाजीवरून चौफेर टीका होतांना दिसत आहे. श्रीरामांवर ‌‌‌‌‌‌देशातील करोडो रामभक्तांची श्रध्दा आहे.

सर्वसामन्य नागरीकांना अयोध्येत राम आले याचा खूप मोठा आनंद आहे. या सोहळ्यावर अशोक चव्हाण यांनी केलेली उपहासात्मक केलेली टीका नांदेडकरांना काही रुचली नाही. यामुळे रामभक्त व हिंदुत्ववादी मतदार दुखावले गेल्याची चर्चा आहे. जर शुभेच्छा द्यायच्याच होत्या तर खुल्या अंतःकरणाने व‌ कोणत्याही प्रकारची मनात आढी न ठेवता द्यायला पाहिजे होत्या, आशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

(Edited by Avinash Chandane)

Ashok Chavan News
Dharashiv lok sabha constituency : आमदारकीची हॅटट्रिक; आता विक्रम काळेंना खासदारकीचे वेध

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com