Chhatrapati Sambhajinagar : मुंबईच्या मीरा-भाईंदर परिसरात घडलेला प्रकार म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील व लाखो मराठाबांधवांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने घडवलेले षड्यंत्र होते, असा गंभीर आरोप करीत खासदार इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली. तत्पूर्वी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक्सवर पोस्ट करीत तुमचा उत्सव संपला असेल, तर माझ्या मतदारसंघातील हे प्रश्न सोडवा, असे म्हणत टीका केली आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा 22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यादिवशी संपूर्ण देशात अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मात्र या सोहळ्यावर भाजपकडून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे राजकारण केले जात असल्याची टीका केली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत मोदींना लक्ष्य केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपल्या मतदारसंघातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे पंतप्रधान मोदींचे (PM Modi) लक्ष वेधण्यासाठी इम्तियाज जलील यांनी सविस्तर पोस्ट करीत सवाल उपस्थित केले आहेत. ' मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचा उत्सव पूर्ण झाला असेल आणि आता तुम्ही निवडणूक प्रचारात व्यस्त असाल तर मी तुम्हाला विनंती करू शकतो. कृपया औरंगाबाद या माझ्या मतदारसंघातील लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करा.'
'सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेले हे गंभीर प्रश्न आहेत. औरंगाबादमध्ये दर 5-7 दिवसांनी नळाला पाणी मिळते. माझ्या मतदारसंघातील महिलांना रोज नाही तर दोन दिवसांतून एकदा तरी नळाला पाणी कधी मिळेल ते सांगता का? माझ्या जिल्ह्यात 3300 सरकारी शाळांच्या वर्गखोल्या टीनशेडच्या छताखाली चालतात. आपण आपल्या सूचना देण्यासाठी थोडा वेळ देऊ शकलात तर पंतप्रधान कार्यालयाला या शाळांचा अहवाल मिळवणे आणि त्यांना अभ्यास करण्याची सन्मानपूर्वक संधी देणे शक्य होईल,' असं जलील म्हणाले आहेत.
तसेच 'तुमच्या बहुचर्चित प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघरांना एकही घर देण्यात आलेले नाही. माझ्या मतदारसंघातील 60,000 लोकांनी अर्ज केले होते आणि ते 7 वर्षांपासून प्रतीक्षा करीत आहेत. एका व्यक्तीला घर देणे तर सोडा, माझ्या जिल्ह्यात एकाही घराचे बांधकामही सुरू झालेले नाही. मग मार्च 2022 पर्यंत देशातील प्रत्येक बेघरांना पक्के घर मिळेल, असे खोटे आश्वासन तुम्ही का दिले?' असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.
याचबरोबर माझ्या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत आणि 2023 मध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे जाणून घ्यायचे असेल तर त्यांची संख्या मराठवाड्यात तब्बल 1100 आहे. खासदारांना आरामात बसता यावे, यासाठी तुम्ही शेकडो कोटी रुपये संसद भवन बांधण्यासाठी खर्च केले आहेत, हे मला माहीत आहे. पण तो अधिकार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही का दिला जात नाही ? असे म्हणत इम्तियाज यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.