Ashok Chavan : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांनी जपली घराणेशाही : पती-पत्नी, पिता-पुत्राला भाजपकडून महापालिकेची उमेदवारी

Nanded Municipal Election : नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपने अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पती-पत्नी आणि पिता-पुत्रांना उमेदवारी दिल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
BJP leader Ashok Chavan during Nanded Municipal Corporation election preparations amid controversy over party tickets being allotted to husband-wife and father-son candidates.
BJP leader Ashok Chavan during Nanded Municipal Corporation election preparations amid controversy over party tickets being allotted to husband-wife and father-son candidates.Sarkarnama
Published on
Updated on

Nanded-Waghala Muncipal Corporation News : नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिली होती. पक्षाने घराणेशाहीची परंपरा जपली, पण जनतेने ही घराणेशाही नाकारत या सहाही उमेदवारांना घरी बसवले होते. यानंतरही भाजपने नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत पुन्हा तोच कित्ता गिरवल्याचे दिसून आले आहे. पती-पत्नी, पिता-पुत्र अशा नात्यागोत्यांनाच उमेदवारी देत बाहेरून पक्षात आलेल्यांसाठी पायघड्या अंथरल्याचे दिसून येत आहे.

नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची महायुती होऊ शकली नाही. सगळे पक्ष स्वबळावर लढत आहेत. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार, तिकीट वाटप याची सगळी जबाबदारी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर होती.

राज्याचे निवडणुक प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड महापालिकेसाठीचे सर्व एबी फाॅर्म हे चव्हाण यांच्या ताब्यात दिले होते. आता जेव्हा भाजप उमेदवारांची यादी समोर आली आहे, तर त्यात पुन्हा एकदा घराणेशाही आणि आपल्या समर्थकांची वर्णी कशी लागेल? याची काळजी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.

BJP leader Ashok Chavan during Nanded Municipal Corporation election preparations amid controversy over party tickets being allotted to husband-wife and father-son candidates.
Shiv Sena news : ठाकरेंच्या पक्षांवर 'मामू' म्हणत टीका करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून एकही मुस्लिम उमेदवार नाही; 'या' दोघांचेच यादीवर वर्चस्व!

अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांची वर्णी लागली आहे, तर काहींच्या पदरी निराशा आली आहे. समर्थकांची वर्णी लावतांना चव्हाण यांनी अगदी एकाच घरात दोन-दोन तिकीटे दिल्याचेही समोर आले आहे. यात प्रामुख्याने यापूर्वी माजी महापौर आणि माजी सभापती म्हणून पदं भूषवलेले पिता-पुत्र, पती-पत्नीलाही उमेदवारी देण्यात आली आहे.

BJP leader Ashok Chavan during Nanded Municipal Corporation election preparations amid controversy over party tickets being allotted to husband-wife and father-son candidates.
Ashok Chavhan : अशोक चव्हाणांसमोर बालेकिल्ला टिकविण्याचे आव्हान; विरोधकांनी टाकलाय मजबूत डाव...

भाजपने माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले, त्यांचे सुपुत्र वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही याआधी काँग्रेसमध्ये होते. याशिवाय किशोर स्वामी आणि त्यांच्या पत्नी शैलेजा स्वामी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 2017 च्या निवडणुकीत हे दोघं पती-पत्नी काँग्रेसकडून (Congress) निवडून आले होते. किशोर स्वामी हे स्थायी समितीचे सभापती तर त्यांच्या पत्नी शैलजा यांना महापौर पदाची संधी मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com