
Parliament session News : पहलगाम येथील दहशतवादी हल्यानंतर भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रतिहल्ला चढवला. पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे, महत्वाची विमानतळे उद्धवस्त करत भारताने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम यांनी सोशल मिडियावर सर्वप्रथम पोस्ट करत आपण भारत-पाकिस्तानला युद्धबंदी करायला लावली, असा दावा केला. यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress) यांच्यासह विरोधी पक्षांनी मोदी अमेरिकेच्या दबावासमोर झुकले, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात का घेतले नाही? आपली किती विमाने पडली? असे प्रश्न उपस्थित करत सरकार देशाला खरी माहिती देत नसल्याचा आरोप केला. यावर राज्यसभेत चर्चेत सहभागी होताना खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सडेतोड उत्तर दिले. विरोधकांनी किमान भारतीय सैन्यावर तरी विश्वास दाखवायला हवा होता, असा शब्दात चव्हाण यांनी आक्रमक भाषण केले.
'ऑपरेशन सिंदूर'ला आंतरराष्ट्रीय समुदायाचे समर्थन मिळाले नसल्याचा विरोधी पक्षांचा दावा वस्तुस्थितीशी विसंगत आहे. (Ashok Chavan) अमेरिका, ब्रिटन, इस्रायल, फ्रान्स, रशिया, जपान, सौदी अरेबिया, कतार, युएई, युरोपीय युनियन यांसारख्या देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत भारताच्या स्वसंरक्षणाच्या हक्काचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने भारताविरुद्ध आणलेल्या ठरावाला पाकिस्तान, चीन आणि तुर्की अशी फक्त तीनच मते पडली. हा भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा नाही का?
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला विनंती केल्यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष थांबला, ही वस्तुस्थिती भारतीय सैन्याने स्पष्ट केली आहे. मात्र, विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे दिसते. राजकीय विरोधामुळे विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत. त्यांनी किमान भारतीय सैन्यावर तरी विश्वास दाखवायला हवा होता, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला.
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी 'ऑपरेशन महादेव'अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील तीन हल्लेखोर दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले. विरोधी पक्ष यावरही शंका उपस्थित करत आहेत. या कारवाईला 'ऑपरेशन महादेव' असे नाव देणे हा राजकीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. ही बाब दु:खद आणि लज्जास्पद आहे.
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय सैन्याने अचूक कारवाई करत दहशतवाद्यांची तळे आणि पाकिस्तानची लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त केली. 'ब्रह्मोस'सारखे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित क्षेपणास्त्र गेमचेंजर ठरले. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे नष्ट केली. संपूर्ण जगाने 'मेक इन इंडिया'ची ताकद पाहिली. 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेतून दहशतवाद आणि पाकिस्तानविरूद्ध देश एकसंघ असल्याचा संदेश जाणे अपेक्षित होते. मात्र, या चर्चेत विरोधी पक्षांनी केवळ राजकारण करणे दुर्दैवी, असल्याचे अशोक चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.