Opration Sindoor : 2 महिला अधिकाऱ्यांनी जगाला सांगितलं... होय, पाकिस्तानला आम्ही घरात घुसून मारलंय!

Opration Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला.
Col. Sofiya Qureshi & Wg Cdr Vyomika Singh
Col. Sofiya Qureshi & Wg Cdr Vyomika SinghSarkarnama
Published on
Updated on

Opration Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात 70 हून दहशतवादी ठार झाल्याची माहिती असून तीन प्रमुख दहशतवादी संघटनांची मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली.

दरम्यान, ही माहिती देताना मोदी सरकारने देशाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त संदेश दिले. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी सरकारने दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोघींनी या हल्ल्याबद्दल इत्यंभूत माहिती दिली. हल्ला कधी केला, कुठे केला, कोणत्या कोणत्या दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त झाले? याबद्दलची सर्व माहिती या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली.

Col. Sofiya Qureshi & Wg Cdr Vyomika Singh
Operation Sindoor : मोदींचा पाकिस्तानला दणका; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानमध्ये नुसता गोंधळ

या हल्ल्याची माहिती देण्यासाठी सरकारने महिला अधिकाऱ्यांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली होती. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये पुरुष नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. बायको, बहीण, आई आणि मुलांच्या समोर मारण्यात आले होते. नेव्हीतील लेफ्टनंट विनय नरवाल यांचे तर 16 एप्रिल रोजी लग्न झाले होते. ते फिरण्यासाठी पत्नी हिमांशीसोबत पहलगाम येथे आले होते. 22 एप्रिल रोजी पत्नी हिमांशीसमोरच विनय यांना त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळी घालण्यात आली. त्यामुळेच या ऑपरेशनला 'सिंदूर' असे नाव देण्यात आले होते.

Col. Sofiya Qureshi & Wg Cdr Vyomika Singh
Operation Sindoor : त्यांचा सुपडासाफ करा...! 'ऑपरेशन सिंदूर'वर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, भारतीय लष्कराचं केलं तोंडभरून कौतुक

या दुःखावर फुंकर घालण्यासाठीच ऑपरेशनची माहिती देण्यासाठीही नारी शक्तीची निवड करण्यात आली होती. युनिफॉर्ममधील दोन महिला अधिकारी जेव्हा जगाला माहिती देत होत्या तेव्हा भारतातील महिला या हल्ल्यानंतर कमजोर झालेल्या नाहीत, हे दाखवण्यातही भारत यशस्वी ठरला. सोफिया कुरेशी या मुस्लीम धर्मीय महिला अधिकाऱ्याची निवड करण्यामागे भारताला आणि जगाला संदेश देण्यात आला की, ही लढाई मुस्लीम धर्मीयांविरोधात नाही. तर पाकिस्तान आणि दहशतवाद या विरोधात आहे. एकूणच एक एक पाऊल अत्यंत विचारपूर्वक उचलण्यात आल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com