Nanded Lok Sabha Constituency : 'चारसौ पार'मध्ये चिखलीकरांचा नंबर वरचा; अशोक चव्हाणांची शाहांना 'गॅरंटी'

Nanded Lok Sabha Constituency : संविधानात बदलासाठी भाजपला बहुमत पाहिजे आहे हा खोटा प्रचार सध्या देशभरात विरोधकांकडून केला जातोय. दिशाभूल करून मतविभाजनाचा हा डाव आहे. पण मी शपथ घेऊन सांगतो संविधानात कुठल्याही प्रकारचा बदल भाजप करणार नाही.
Amit Shah, Ashok Chavan
Amit Shah, Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुरुवारी (ता. ११) चव्हाणांनी एक गॅरंटी दिली. भाजपच्या मिशन चारसौ पार मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे शंभर टक्के मत मिळवून वरच्या क्रमांकावर असतील, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. Ashok Chavan Guaranty to Amit Shah at Nanded.

मी आणि प्रतापराव आधी ऐकमेकांचे विरोध होतो, पण आता आम्ही एकच आहोत, अशी ग्वाही चव्हाण यांनी यावेळी दिली. महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर Prataprao Patil Chikhalikar यांच्या प्रचारार्थ नरसी येथे अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. शाह यांच्या भाषणापूर्वी खासदार अशोक चव्हाण यांचे भाषण झाले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

प्रतापराव सतर्क राहा, सुस्तावले पणा सोडा, जोमाने कामाला लागा, शेवटपर्यंत काम करावे लागेल असे सांगतांना नरेंद्र मोदी जशी देश पातळीवर विकासाची गॅरंटी देतात, तसं मी स्थानिक पातळीवर प्रतापराव पाटील यांना शंभर टक्के मतांनी निवडून आणण्याची गॅरंटी देतो. चार सौ पार मध्ये प्रतापराव वरच्या क्रमांकावर राहतील. नांदेडकरांनी, नियतीने मला आणि चिखलीकरांना एकत्र आणले. लोकसभेची निवडणूक हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, अशी ग्वाही अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी दिली.

लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद व सगळ्याच निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय जिल्ह्यात मिळवून देऊ. आमचे जुने मित्र आणि काँग्रेस पक्षाचे नेतेही सध्या गॅरंटी देऊ लागले आहेत. पण अंमलबजावणी कशी करणार? असा सवाल करत देशातील जनतेचा फक्त मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे, असे सांगत चव्हाण यांनी राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला लगावला.

Amit Shah, Ashok Chavan
Baramati Loksabha : 'विजय शिवतारे मागे लागले की 'सळो की पळो' करतात'; अजित पवार नेमकं काय म्हणाले...

संविधानात बदलासाठी भाजपला बहुमत पाहिजे आहे हा खोटा प्रचार सध्या देशभरात विरोधकांकडून केला जातोय. दिशाभूल करून मतविभाजनाचा हा डाव आहे. पण मी शपथ घेऊन सांगतो संविधानात कुठल्याही प्रकारचा बदल भाजप करणार नाही. सुप्रीम कोर्टाचे तसे आदेश आहेत. संविधानात कुठलाही बदल करता येत नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर होत आहे. पंतप्रधानांच्या भाषणात कुठेही वैयक्तिक टीका नाही. महायुतीच्या राज्यातील नेत्यांच्या भाषणातही असे दिसणार नाही. पण समोरून कोणी टीका केली तर त्याला उत्तर तर द्यावे लागेल, असेही चव्हाण म्हणाले. मोदींचा शब्द पक्का आहे, ते शब्द पाळणारे पंतप्रधान आहेत. विकासाच्या कामाला निधीची कमतरता ते पडू देत नाही. नाना पटोले काहीही बोलतात, पण त्याची अंमलबजावणी होते का?

Amit Shah, Ashok Chavan
Loksabha Election 2024 : उदंड जाहले पक्षांतर... राजकीय उड्यांनी आसमंत गजबजला !

बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे मोदीजींना लागू पडते. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र ही मोदींची गॅरंटी, मग त्यांना चारसौ पार देण्याची गॅरंटी आपल्याला घ्यावी लागेल. जातीपातीत, गटबाजीत अडकलो तर नुकसान होईल. मग पुन्हा संधी नाही, पाच वर्ष वाट पहावी लागेल. चारसौ पार केलं की विकसित भारत, महाराष्ट्र आणि नांदेडही झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पहा, हा सिनेमा नाही देशाच्या विकासात योगदान ठरवणारी ही निवडणूक आहे, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्या, वाराणसीचा विकास कसा झाला तसा माहूरचा विकासही होणार आहे, तीर्थ क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे ही मोदींजीची भूमिका आहे. त्यांचे नेतृत्वाला जागतिक मान्यता आहे असे सांगतानाच चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्याला हात घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. दहा टक्के आरक्षणाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. सगेसोयरेचा विषयही आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Amit Shah, Ashok Chavan
Nanded Loksabha Constituency : 'अशोकराव हे खरंय, तुम्ही आल्यामुळे आम्ही सुस्तावलो...' ; चिखलीकरांची कबुली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com