Baramati Loksabha : 'विजय शिवतारे मागे लागले की 'सळो की पळो' करतात'; अजित पवार नेमकं काय म्हणाले...

Loksabha Election 2024 :अजित पवारांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. मागे खासदार म्हणून 15 वर्षे निवडून दिले त्यांची कारकीर्द पाहा. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या कारकीर्दीवर सतत विरोधच केला तर कसा निधी मिळणार
Vijay Shivtare  Ajit Pawar
Vijay Shivtare Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात दंड थोपटणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारेंनी पुरंदरच्या विकासाच्या मुद्द्यावर तह केला आहे. त्यानंतर सासवडमधील पालखी तळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde उपस्थित मनोमिलन सभा पार पडली. यावेळी अजित पवारांनी शिवतारेंनी हल्ला केला तर ते सळो की पळो करून सोडतात. त्यांचे शत्रुत्व काय आहे ते मी पाहिले आहे, असे म्हणत विजय शिवतारेंबद्दल मोठे वक्तव्य केले.

Vijay Shivtare  Ajit Pawar
Vijay Shivtare News : शिवतारेंनी अजितदादांना दिला शब्द; 'बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असणार'

'विजयराव कुणाच्या मागे लागले तर ते सळो की पळो करून सोडतात. मग ते मागचा पुढचा विचार करत नाहीत. मी विजय शिवतारेंचे शत्रुत्व पाहिले आहे. त्यांनी हातात हात देऊन अजित पवार (Ajit Pawar) मैत्री काय असते ते दाखवून देईल, असा शब्दही दिला आहे.', असे अजित पवार म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व भागातील सर्व प्रकारचे प्रश्न सुटले पाहिजे, अशी मागणी विजय शिवतारे (Vijay Shivtare ) यांनी केली. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या राज्यसरकारच्या आखत्यारीतील आहेत. त्यांचे सर्व प्रश्न आम्ही तिघे मनावर घेऊन सोडवणार आहोत, असे देखील अजित पवार यांनी जाहीर केले.

शिवतारेंचे कौतुक करताना अजित पवारांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. मागे खासदार म्हणून 15 वर्षे निवडून दिले त्यांची कारकीर्द पाहा. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या कारकीर्दीवर सतत विरोधच केला तर कसा निधी मिळणार, याचाही विचार करावा लागणार. सरकारमध्ये असल्याने विकासाला गती देता येते. आत्ताचा उमेदवारी त्यांच्यापेक्षा जास्त निधी आणेल,अशी ग्वाही अजित पवारांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विकासासाठी सत्ताधारी पक्षाचा खासदार केंद्रात गेला पाहिजे. संसदेत भाषणे करून विकास होत नाही. भाषणे करून पोट भरते का? भरले का दहा वर्षात. बापूंनी भूमिका घेतल्यानंतर आता भूमिका मागे घेऊ नका. त्यांच्या भूमिकेला हवा देण्याचे काम करण्यात येत होते. त्यातून कुणाचे भले होणार होते, हे सर्वांना माहिती आहे. मात्र त्यांनी विकासाचे महत्व समजले आणि त्यांनी भूमिका बदलली, असे अजित पवार म्हणाले.

(Edited By Roshan More)

Vijay Shivtare  Ajit Pawar
Loksabha Election 2024 : उदंड जाहले पक्षांतर... राजकीय उड्यांनी आसमंत गजबजला !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com