Pune Congress News : ब्राह्मण म्हणून मला त्रास, राहुल गांधींना 100 ई-मेल! महिला नेत्याचे गंभीर आरोप, काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा...

Sangeeta Tiwari allegations : संगीता तिवारी यांनी लवकरच आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महायुतीतील एका पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
Congress Leader Sangeeta Tiwari
Congress Leader Sangeeta TiwariSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महिला काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष आणि राज्याच्या महिला उपाध्यक्ष असलेल्या संगीता तिवारी यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये मी ब्राह्मण असल्याने त्रास देण्यात आला. माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा कट करण्यात आला. याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना शंभर ईमेल करून देखील दखल घेतली गेली नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

संगीता तिवारी यांनी लवकरच आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला दोन पक्षांकडून ऑफर असून आपण लवकरच महायुतीतील एखाद्या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘सरकारनामा’शी बोलताना संगीता तिवारी यांनी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

तिवारी म्हणाल्या, मला पुणे महिला काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष पद देण्यात आले. मात्र हे पद दिल्यानंतर महिला अध्यक्षांसाठीची केबीन माझ्याकडून काढून घेण्यात आली. ही केबीन एका सेलच्या पदाधिकाऱ्याला देण्यात आली. त्यानंतर मी रागाने केबीनचा ताबा घेण्याचा प्रयत्न करेन, या दृष्टिकोनातून माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा कट पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या माध्यमातून रचला गेल्याचा गंभीर आरोप संगीता तिवारी यांनी केला आहे.

Congress Leader Sangeeta Tiwari
Local Body Elections : इतके फटके बसलेत, त्यातून बाहेर पडणे अवघड! संभाजीराजेंना राजकारणात काय सतावतंय?

मी ब्राह्मण असल्याने ब्राह्मण हे भाजप विचारायचे असून ते आपल्याला मतदान करत नाहीत, अशी भावना काही नेत्यांनी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. काँग्रेसकडे काही ठराविक असलेल्या ब्राह्मण नेत्यांना देखील योग्य वर्तणूक देण्यात येत नसल्याचा आरोप देखील संगीता तिवारी यांनी केला आहे.

संगीता तिवारी पुढे म्हणाल्या, नेता असो किंवा कार्यकर्ता खास करून महिला पदाधिकारी किंवा महिला कार्यकर्ता ह्यांची आपल्याच पक्षात घुसमट होत असेल, अंतर्गत जाणून-बुजून जर त्यांना त्रास देण्यात येत असेल तर वेगळा निर्णय हा घेतलाच पाहिजे. एखाद्या पक्षाला काम करणाऱ्या लोकांची गरजच नसेल, संघटनेची पण गरज नसेल तर निश्चितच वेगळा विचार करायला लागतो. मग त्याला गद्दारी, धोका, एहसान फरामोश... असे काही म्हणा. कुठेतरी सहनशक्ती संपते. खासकरून महिला खूप सहन करतात.

Congress Leader Sangeeta Tiwari
Asaduddin Owaisi : ओवैसींनी कामच असं केलं की पंतप्रधान मोदीही विसरले नाहीत!

शेवटी पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता त्याची जर किंमतच पक्ष करत नसेल तर त्या व्यक्तीने स्वतः विचार करून एक वेगळा निर्णय हा घेतलाच पाहिजे. अशा वेळी जिथे काम करायला संधी आहे, तुमच्या कामाची  किंमत आहे, असा पक्ष निवडून निर्णय घेणे गरजेचे असते, असे तिवारी यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com