Ashok Chavan Meet PM Modi : चिखलीकरांच्या पराभवानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाणांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!

Ashok Chavan and Narendra Modi News : या सदिच्छा भेटीत काय चर्चा झाली हे समोर आले नसले, तरी ही भेट महत्वाची समजली जात आहे
Ashok Chavan Meet PM Modi
Ashok Chavan Meet PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan at Delhi with PM Modi : माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभेतील विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. दिल्लीत सध्या एनडी सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून संसदेच्या दोन्ही सभागृहातील वातावरण चांगलेच तापले आहे.

या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट भेटले.

या सदिच्छा भेटीत काय चर्चा झाली हे समोर आले नसले, तरी ही भेट महत्वाची समजली जात आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर सेंट्रल हाॅलमध्ये मोदींचे अभिनंदन करण्यासाठी अशोक चव्हाण त्यांना भेटले होते. पण ती फक्त औपचारिक भेट होती, मोदींनी यावेळी अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांच्याकडे नीट पाहिले देखील नव्हते. काल मात्र अशोक चव्हाण यांनी मोदींची सदिच्छा भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Ashok Chavan Meet PM Modi
Shivsena UBT News : उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यात भाजपला धक्का देणार...

'अबकी बार चारसौ पार'चे उदिष्ट घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपला(BJP) उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक फटका बसला. लोकसभा निवडणुकीपुर्वी महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. चव्हाण यांच्या पक्ष प्रेवशाने महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात लोकसभेला फायदा होईल, असा भाजप नेत्यांना विश्वास होता.

परंतु मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि भाजप चारशे खासदार निवडून आले की संविधान बदलणार या विरोधकांनी केलेल्या प्रचारामुळे महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला. मराठवाड्यात तर भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही. अशोक चव्हाण यांचे वर्चस्व असलेल्या नांदेड जिल्ह्यात भाजपला पराभव स्वीकारावा लागला. यानंतर जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोप आणि अशोक चव्हाण यांनाही लक्ष्य करण्यात येत होते.

Ashok Chavan Meet PM Modi
Radhakrishna Vikhe Patil : मुंबईत अधिवेशन, पण विखे पिता-पुत्र दिल्लीत जाऊन अमित शाहांना भेटले; 'विषय दूध दरवाढीचा, पण टार्गेट विधानसभा!'

नांदेडमधील भाजपच्या पराभवाने अशोक चव्हाण यांचेही वैयक्तिक राजकीय नुकसान झाल्याचे बोलले जाते. प्रताप पाटील चिखलीकर(Pratap Patil Chikhlikar) निवडून आले असते तर कदाचित अशोक चव्हाण यांना केंद्रात मंत्री पद मिळाले असते, अशी आशा त्यांचे समर्थक बाळगून होते.

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत रिक्त झालेल्या जागेवर अशोक चव्हाण यांना आपल्या समर्थकाची वर्णी लावायची होती, पण नांदेडमधील पराभवाने सगळ्यावरच पाणी फिरले. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट महत्वाची ठरते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com