Shivsena UBT News : उद्धव ठाकरे संभाजीनगर दौऱ्यात भाजपला धक्का देणार...

Uddhav Thackeray Politics : लागोपाठ दोन महिला पदाधिऱ्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली होती. अखेर यांची दखल घेत व आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा दौरा आयोजित केला आहे.
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas DanveSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : आगामी विधानसभा निवडणुक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटातून शिंदेंच्या शिवसेनेत होणारे आऊटगोईंग पाहता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येत्या 7 जुलै रोजी संभाजीनगर दौरा आखला आहे. 'शिवसंकल्प' मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे वचन घेणार आहेत. दरम्यान, याच मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला शहरात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.

भाजपचे माजी स्थायी समिती सभापती व इतर काही पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील पूर्व-पश्चिम, मध्य विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीला टक्कर देण्यासाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. शिवसेनेचे पश्चिमचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात ठाकरे गट तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे.

या पार्श्वभूमीवर 7 तारखेच्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा होणारा प्रवेश महत्वाचा समजला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे दुसऱ्यांदा पराभूत झाले. त्यानंतर ठाकरे गटात विशेषतः महिला आघाडीत मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य समोर येताना दिसले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या समर्थक अशी ओळख असलेल्या महिला आघाडीच्या संघटक प्रतिभा जगताप, माजी सभागृहनेता गजानन मनगटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला होता. हा प्रवेश होऊन आठवडा उलटत नाही तोच माजी महापौर आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे समर्थक कला ओजा काही महिला पदाधिकाऱ्यासह पक्ष सोडून शिंदे गटात गेल्या.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
T-20 World Cup : राज्य सरकार गुजरातच्या 'आका'समोर झुकले; T-20 जल्लोषावरून नाना पटोलेंचा हल्लाबोल, नेमकं काय झालं?

लागोपाठ दोन महिला पदाधिऱ्यांनी पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली होती. अखेर यांची दखल घेत व आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा दौरा आयोजित केला. त्यानुसार येत्या 7 रोजी संभाजीनगर शहरातील बीडबायपास परिसरातील सूर्या लाॅन येथे हा संकल्प मेळावा होत आहे.

याची जय्यत तयारी स्थानिक पातळीवर सुरू असतानाच भाजपच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधत उद्धव ठाकरे महायुतीला दणका देण्याच्या तयारी आहेत. दरम्यान, या मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी शिवसेना भवन येथे चंद्रकांत खैरे यांनी आज बैठक बोलावली होती. या मेळाव्याची जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खैरे यांनी केले.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Video Mahadev Jankar News : 'बहिणी'ला विधानपरिषद, आता 'भाऊ' राज्यसभेवर जाणार का ? जानकरांचे मोठे संकेत, महायुतीचे टेन्शन वाढले

केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या आडमुठे धोरणामुळे सध्या शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. महागाई, बेरोजगारी आदी गोष्टीशी सरकारला घेणेदेणे नाही, फक्त सत्ता स्थापन करण्याची त्यांना घाई झाली आहे. येणार्‍या निवडणुकीत राज्यात सत्तांतर अटळ असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहनही या बैठकीत खैरे यांनी केले.

शहरावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. तीच परंपरा शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी कायम राखली आहे. यामुळेच शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विचार व मार्गदर्शन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असेही खैरे म्हणाले.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve
Vasant More : सर्वात आधी शिवसैनिक, मग मनसैनिक, नंतर भीमसैनिक अन् आता पुन्हा शिवसैनिक! वसंत मोरेंचं नेमकं चाललंय काय..?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com