Nanded Mahapalika : नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचाच जलवा! 4 आमदारांच्या शिवसेनेला अन् मोठा पक्ष म्हणवणाऱ्या राष्ट्रवादीला दाखवली 'जागा'

Nanded Muncipal Council Result : अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजपने नांदेड-वाघाळा महापालिकेची सत्ता राखली, शिवसेना व राष्ट्रवादीला दूर ठेवत बहुमत मिळवले, स्थानिक समीकरणे, तिकीट वाटप आणि रणनीती यशस्वी ठरली, निवडणुकीत जनमत स्पष्ट झाले.
Ashok Chavan addresses party workers after BJP retained control of the Nanded-Waghala Municipal Corporation, successfully blocking Shiv Sena and NCP to secure a clear majority.
Ashok Chavan addresses party workers after BJP retained control of the Nanded-Waghala Municipal Corporation, successfully blocking Shiv Sena and NCP to secure a clear majority.Sarkarnama
Published on
Updated on

Nanded BJP News : राज्याचे दोनवेळचे मुख्यमंत्री, दोनवेळचे खासदार अन् आता राज्यसभेवर भाजपकडून प्रतिनिधित्व करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी नांदेडची सत्ता राखली. काँग्रेसमध्ये असताना एकहाती सत्ता मिळवणाऱ्या चव्हाण यांनी यावेळी आपली ताकद भाजपचे कमळ फुलवण्यासाठी लावली. शिवसेनेसोबत युती न करण्याची खेळी करत बहुमतासह महापालिका ताब्यात घेण्यात अशोक चव्हाण यशस्वी ठरले आहे. नांदेडमध्ये सबकुछ अशोक चव्हाण यासाठी केलेली आखणी तंतोतंत अंमलात आली.

नांदेड हे फक्त माझे घर, मतदारसंघ नाही तर माझा आत्मा, अस्तित्व असल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी दंड थोपटले होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत 3 नगराध्यक्ष निवडुन आणत अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याचा मुड ओळखला होता. नांदेड महापालिकेसाठीची सगळी सुत्रं हाती आल्यानंतर सामाजिक, जातीय समीकरणं जुळवत केलेले तिकीट वाटप, शिवसेनेला दूर ठेवत शतप्रतिशत भाजप आणि स्वतःची सत्ता आणण्याचा डाव अखेर अशोक चव्हाण यांनी जिंकला.

महायुतीत घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी हातमिळवणी करत अशोक चव्हाण यांना टार्गेट केले होते. महापालिकेत ही डोकेदुखीच नको, असे ठरवत अशोक चव्हाण यांनी सुरूवातीपासूनच शिवसेनेला दूर लोटले.

वरिष्ठ पातळीवरून युती करा, असे आदेश आल्याने अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला आठ-ते दहा जागांचा प्रस्ताव दिला. जो आमदार हेमंत पाटील हे मान्य करणार नाही याची कल्पना अशोक चव्हाणांना होती. घडलेही तसेच! हेमंत पाटील यांनी थेट चिखलीकरांशी हातमिळवणी करत युती केली.

अशोक चव्हाण यांचा यामुळे सुंठी वाचून खोकला गेला. नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी वेगळी भूमिका घेतली. तर दक्षिणमध्ये दोन्ही शिवसेना स्वतंत्र लढल्या. शिवसेनेने राष्ट्रवादीच्या जीवावर केलेले धाडस त्यांच्या अंगलट आले. तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी एकहाती 45 जागा जिंकत मैदान मारले. 81 पैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकल्यामुळे भाजपला आता सत्तेसाठी कोणाच्याही कुबड्यांची गरज उरली नाही.

या निकालामुळे मागील 29 वर्षांपासून आजतागायत निर्विवाद वर्चस्व असलेल्या काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवत अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये आपलाच आवाज चालतो हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भाजपने निवडणुकीपूर्वी सूक्ष्म नियोजन करून प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली.

एमआयएम-काँग्रेसला अपेक्षित यश..

अशोक चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधील आपल्या मुस्लिम समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना एमआयएममध्ये पाठवण्याची जुनीच खेळी केली. त्यामुळे मुस्लिमांची जी मते काँग्रेसकडे गेली असती ती एमआयएमकडे वळून अशोक चव्हाणांनी काँग्रेसला लगाम घातला. नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसकडे असल्याचा काही प्रमाणात फायदा पक्षाला झाला. काँग्रेसने 10 जागा जिंकल्या, वंचितनेही पाच जागा जिंकत आपली वोट बँक राखली. तर एमआयएमने 14 जागा जिंकत भाजपच्याच विजयाला हातभार लावला.

त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांकडे प्रचारासाठी ठोस मुद्दे आणि यंत्रणा नसल्याने मतदारांनी त्यांना मर्यादित यश दिले. या निवडणुकीत भाजप 45, एमआयएम 14, काँग्रेस 10, वंचित 5, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 तर अपक्षाने एका जागेवर यश मिळवले. नांदेड महापालिकेत भाजप नंतर सर्वात मोठा पक्ष एमआयएम राहिला आहे.

Ashok Chavan addresses party workers after BJP retained control of the Nanded-Waghala Municipal Corporation, successfully blocking Shiv Sena and NCP to secure a clear majority.
Latur MahaPalika : लातूरात पंजा-पंजा-पंजा! अमित देशमुखांची जादू चालली; कमळ-कमळ-कमळ म्हणत गमछा भिरकवणारे संभाजी पाटील निलंगेकर तोंडघशी!

4 आमदार तरी शिवसेना फेल..

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नांदेडमध्ये तीन आमदार आहेत. या शिवाय विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनीही महापालिका निवडणुकीत महत्वाची भूमिका घेतली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील आमदारांना भरघोस निधी दिला तरी शहरातील मतदारांनी शिवसेनेला नाकारले. या पक्षाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.

Ashok Chavan addresses party workers after BJP retained control of the Nanded-Waghala Municipal Corporation, successfully blocking Shiv Sena and NCP to secure a clear majority.
Nanded Congress: नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर मध्यरात्री तलवारीने हल्ला

अशीच अवस्था स्वतःला नांदेडमध्ये नंबर एकचा पक्ष करण्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीचीही झाली. दोन जागांसह अजितदादांची राष्ट्रवादी खालच्या क्रमांकावर राहिली. एका ठिकाणी अपक्षाचे नशिब फळफळले. एकूणच अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये इतर कुणाची लुडबूड नको म्हणून केलेली नाकाबंदी प्रभावी ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com