Ashok Chavan News : `मी जिथे आहे, तिथेच बरा`.. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चव्हाण बोलले..

Nanded News : येणाऱ्या काळात अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात येतील, असे बावनकुळे यांनी म्हटले होते.
Ashok Chavan News, Nanded
Ashok Chavan News, NandedSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Congress News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तीन दिवसांपुर्वी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा केला होता. (Ashok Chavan News) यावर चव्हाण यांनी काहीच भाष्य केले नव्हते, पण नागपूरात त्यांना माध्यमांशी बोलतांना `मी जिथे आहे, तिथेच बरा`, अशा मोजक्या शब्दात भाजप प्रवेशाच्या चर्चा फोल असल्याचे सांगितले.

Ashok Chavan News, Nanded
Nanded Congress News : नांदेडची जागा भाजप जिंकू शकत नाही, म्हणून अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा...

चव्हाण यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या चर्चा जेव्हा जेव्हा होतात, तेव्हा तेव्हा चव्हाण हे काँग्रेस पक्षात स्वतःला झोकून देऊन काम करतात हा आतापर्यंतचा अनुभव. चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) यांनी अशोक चव्हाण यांच्या भाऊराव सहकारी साखर कारखान्याला महायुती सरकारडून मिळालेल्या दीडशे कोटीचा हवाला देत त्यांच्या भाजप प्रवेशाचा दावा केला होता.

यापुर्वीही चिखलीकरांनी अनेकदा चव्हाण (Ashok Chavan) यांच्याबद्दल असे दावे केले होते. यावर ` दावे केण करतयं`, असे म्हणत चिखलीकरांची खिल्ली उडवली होती. आता पुन्हा त्यांनी बावनकुळे-चिखलीकर यांचे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सांगत विषय संपवला. चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडच्या दौऱ्यावर आले असताना विविध पक्षांचे नेते भाजपात येण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येणाऱ्या काळात अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात येतील, असेही बावनकुळे यांनी म्हटले होते. खासदार चिखलीकरांनी माध्यमांशी बोलतांना बावनकुळे यांच्या विधानाचाच आधार घेत चव्हाणांचे भाजपमध्ये स्वागत करण्यासाठी आपण उत्सूक असल्याचे म्हटले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या `भारत जोडो` यात्रे आधीही चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण `भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील संपुर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत चव्हाण यांनी ती यशस्वी करून दाखवली होती.

चव्हाण आणि त्यांच्या टीमने भारत जोडो यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले. राहुल गांधी यांनीही अशोक चव्हाण यांची पाठ थोपटली होती. एककीडे भाजपकडून अशोक चव्हाण यांना गळ टाकले जात आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस नेतृत्वाकडून मात्र त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. देशपातळीवर काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य पद, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत निरीक्षक आणि पंधरा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Ashok Chavan News, Nanded
Nanded BJP News : खासदार चिखलीकरांशी आणखी एका आमदाराने घेतला पंगा...

ही जबाबदारीही चव्हाण यांनी यशस्वीपणे पार पाडत पक्षाच्या विजयात हातभार लावला. तसेच कठीण परिस्थितीत असलेल्या सहा जागाही निवडून आणल्या. लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत असतांना योग्य टायमिंग साधत पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा माईंड गेम खेळला जात आहे. अशोक चव्हाण यांचे सावली म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी भाजपच्या या कुरापतींवर कडाडून हल्ला चढवतांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेच कसे दल बदलू आहेत, हे सांगितले.

शिवाय ते बीआरएसकडून लोकसभा लढवण्याच्या तयारीत असल्याचे सूचक विधानही केले. अशोक चव्हाण यांनी या विषयावर अधिक भाष्य न करता या चर्चा संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात येत आहेत. नांदेडची जागा भाजपाच्या सर्वेक्षणात डळमळीत आहे. त्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा या चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. मी जिथे आहे तिथे बरा आहे, पक्षाचे काम करत आहे, असेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. आता यानंतर तरी चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि नेत्यांकडून केली जाणारी विधानं थांबतात का? हे पहावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

Ashok Chavan News, Nanded
Nanded BJP Politics : अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यास चिखलीकर एवढे आतुर का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com