Marathwada Political News : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. नायगांवचे भाजप आमदार राजेश पवार यांच्याशी चिखलीकरांचे बिनसल्याची चर्चा असतानाच आता आणखी एका भाजपच्या आमदाराने त्यांच्याशी पंगा घेतल्याचे समोर आले आहे. (Nanded BJP News) आमदार तुषार राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लागलेल्या होर्डिग आणि जाहिरातीतून खासदार चिखलीकरांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
गेल्याच आठवड्यात चिखलीकरांनी बोलावलेल्या बैठकीत आमदार राजेश पवार यांच्यावर चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) समर्थकांनी ते काँग्रेस धार्जिणे असल्याचा आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपच्या आमदाराबद्दल बैठकांमधून नाराजीचा सूर निघत असल्याने चिखलीकरांची डोकेदुखी वाढत आहे. (BJP) लोकसभा निवडणूक जवळ आली असताना नांदेड भारतीय जनता पक्षातील गटबाजी थांबायलाच तयार नाही.
मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा होर्डिंग्जमधून खासदार प्रताप पाटील-चिखलीकरांचा फोटो वगळल्याचा प्रकार समोर आला आहे. (Nanded) पक्षाच्या आमदाराच्या वाढदिवसाच्या जाहिराती, होर्डिंगमध्ये खासदारांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. फोटो वगळल्याने चिखलीकर समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. भाजपने मिशन 45 प्लस सुरू केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे काही दिवसांपूर्वी नांदेडला येऊन गेले. निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नांदेडसह 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याचा दावा केला. नांदेडची जागा पुन्हा जिंकण्याच्या तयारी असलेल्या भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येत आहे. नांदेडची जागा आधीच डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यात चिखलीकरांना त्यांच्या पक्षातील आमदारांचा विरोध होतांना दिसतो आहे.
आमदार राठोड यांच्या वाढदिवसानिमित्ताने मुखेड शहरातील विविध भागात शुभेच्छा होर्डिंग्ज समर्थकांनी लावले. यात पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे फोटो आहेत, पण खासदार चिखलीकरांचा फोटो टाळण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांचे राजकीय संबंध बिघडले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नांदेड येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुक तयारीच्या बैठकीत नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्यावर चिखलीकर समर्थक बालाजी बच्चेवार यांनी गंभीर आरोप केले होते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत नायगाव व मुखेड विधानसभा मतदारसंघातून चिखलीकर यांना मताधिक्य मिळाले होते. पण गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही मतदारसंघांचे आमदार व खासदार चिखलीकर यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. याचा परिमाण लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिखलीकरांना दुसऱ्यांदा दिल्ली गाठायची असेल तर या दोन्ही आमदारांना सोबत घेऊन पुढे जावे लागणार आहे.
तुषार राठोड यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या हितचिंतकांचे आभार मानणारी पोस्ट केली आहे. त्यात खासदार चिखलीकरांचा फोटो वापरण्यात आला आहे, पण राठोड यांच्या समर्थकांनी मात्र त्यांचे फोटो टाळले. यावरून नांदेड भाजपमध्ये `कुछ तो गडबड है`, हे स्पष्ट होते. आता या वादावर पक्षाचे वरिष्ठ नेते कसा मार्ग काढतात यावर लोकसभेचा मार्ग अवघड की सोपा? हे ठरेल.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.