Ashok Chavan News : लोकसभेला नांदेडमध्ये पराभव झाल्याने अशोक चव्हाण अलर्टवर ; भोकर राखण्यासाठी सुरू केली तयारी...

Ashok Chavan and Shrijaya Chavan Vidhan Sabha Election : आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या विरोधात मराठवाड्यात व राज्यात असलेले वातावरण आणि चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे असलेल्या नाराजीचा फटका चिखलीकर यांना बसला.
Ashok Chavan, Shrijaya Chavan
Shrijaya chavhan, Ashok Chavhan Sarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : भाजप राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवामुळे धक्का बसला आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विजयाची शंभर टक्के गॅरंटी पंतप्रधान मोदी यांना अशोक चव्हाण यांनी दिली होती. पण मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या विरोधात मराठवाड्यात व राज्यात असलेले वातावरण आणि चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या निर्णयामुळे असलेल्या नाराजीचा फटका चिखलीकर यांना बसला.

चिखलीकर-चव्हाण यांची जोडी आणि त्यांच्या समर्थकांचे बळ असूनही नांदेड लोकसभा मतदारसंघात दारूण पराभव झाल्याने अशोक चव्हाण अलर्ट झाले आहेत. मुलगी श्रीजया हिच्या राजकीय पदार्पणासाठी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अधिक जोरकसपणे तयारी सुरु केली आहे. भोकर या आपल्या पारंपारिक मतदारसंघात चव्हाण कुटुंब झपाटून कामाला लागल्याचे चित्र आहे.

Ashok Chavan, Shrijaya Chavan
Marathwada BJP Politics : मराठवाड्यात भाजपला घरघर; सूर्यकांता पाटील, किन्हाळकर, भालेराव यांच्यानंतर कोणाचा नंबर?

दिवंगत काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या 14 जुलै रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमातून चव्हाण कुटुंब भोकरमधून आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे. दरवर्षी होणाऱ्या या जयंती कार्यक्रमाचे यावेळचे विशिष्ट म्हणजे यंदा अशोक चव्हाण हा कार्यक्रम भाजपचे खासदार म्हणून करणार आहेत.

पण या कार्यक्रमात कुठेही भाजपचा (BJP) कार्यक्रम असे स्वरूप येऊ नये याची विशेष काळजी स्वत: अशोक चव्हाण व ज्यांच्यावर नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे ते माजी मंत्री डी. पी.सावंत घेताना दिसत आहे.

शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे जिथेतिथे बॅनर लागले आहे, त्यावर चव्हाण कुटुंबातील व्यक्तीशिवाय इतर कोणाचे फोटो लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

Ashok Chavan, Shrijaya Chavan
Amit Deshmukh News : 'नितीन गडकरींच्या कामाबद्दल शंका नाही पण...', अमित देशमुख विधिमंडळात गरजले

जयंतीचा कार्यक्रम हा पूर्णपणे कौटुंबिक राहावा, असे प्रयत्न चव्हाण यांच्याकडून होतांना दिसत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा काँग्रेस ने स्वतंत्रपणे दिवगंत शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन पक्ष कार्यालयात केले आहे. अशोक चव्हाण हे काही महिन्यापूर्वी पर्यंत काँग्रेसमध्ये होते. त्यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण यांची सगळी हयात काँग्रेस पक्षात गेली.

मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची विचारधारा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या निर्णयाचा फटका त्यांना लोकसभा निवडणुकीत बसला. पुन्हा तो भोकर विधानसभा मतदारसंघात बसू नये, यासाठी अशोक चव्हाण कामाला लागले आहेत.

मुलगी श्रीजया हिचा या निमित्ताने राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता असून भोकरची जागा कुठल्याही परिस्थितीत जिंकायचीच या निर्धाराने अशोक चव्हाण व त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर घरच्या मतदारसंघात झालेले डॅमेज कंट्रोल करण्यात अशोक चव्हाण यांना यश मिळते का? हे लवकरच दिसेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com