BJP Maharashtra News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत भारताचा आध्यात्मिक आणि धार्मिक अभिमान वाढवला असल्याचे गौरवोद्दगार खासदार अशोक चव्हाण यांनी काढले. भाजपाच्या वतीने संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला जात आहे. याच अनुषंगाने अशोक चव्हाण यांनी देशाची आध्यात्मिक आणि धार्मिक वाटचाल, त्याद्वारे साधली जात असलेली प्रगती याबद्दल आपले मत व्यक्त केले.
पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी (Narendra Modi) यांच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत भारताच्या आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्राने सांस्कृतिक वारसा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक प्रभाव यांचा समन्वय साधला आहे. महाकुंभ, श्री राम मंदिर, पुरातन वस्तूंची पुनर्प्राप्ती आणि 'राजपथ'चे 'कर्तव्य पथ' असे नामकरण यांसारख्या उपक्रमांनी आणि निर्णयांनी भारताचा आध्यात्मिक अभिमान वाढवला आहे.
यासोबतच, पर्यावरणीय आणि डिजिटल उपाययोजनांनी आध्यात्मिक क्षेत्राला आधुनिक काळाशी जोडले आहे. या बदलांनी भारताला आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून स्थापित केले आहे.मोदी सरकारच्या काळातील प्रमुख निर्णय, उपक्रम आणि उपलब्धीचा उल्लेख करत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मोदींच्या जागतिक नेतृत्वाचे कौतुकही केले.
महाकुंभ 2025 हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा बनला. 45 दिवसांत 65 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले, ज्यामुळे भारताच्या कालातीत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आत्म्याला पुनर्जनन मिळाले. आध्यात्मिक पर्यटनात क्रांतिकारी परिवर्तन झाले. 2024 मध्ये 16 कोटींहून अधिक भाविकांनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला भेट दिली, जिथे श्रद्धा आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा संगम घडला.
काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा पुनर्विकास करण्यात आला. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आणि भाविकांना सुविधा उपलब्ध झाल्या. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढला. उदाहरणार्थ, ऑनलाइन दर्शन आणि बुकिंग सुविधा तसेच तीर्थक्षेत्रांवरील डिजिटल माहिती केंद्रांमुळे भाविकांना सुलभता मिळाली.
योग, आयुर्वेद आणि भारतीय तत्त्वज्ञानाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिन (21 जून) हे याचे ठळक उदाहरण आहे, ज्याला जगभरात मान्यता मिळाली. यामुळे भारताच्या आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार झाला. 2014 पासून 642 पुरातन वस्तू परत आणल्या गेल्या, ज्यामुळे चोरलेला सांस्कृतिक वारसा पुन्हा प्राप्त होऊन राष्ट्रीय अभिमानाला बळकटी मिळाली. संग्रहालये आणि सांस्कृतिक केंद्रांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. उदाहरणार्थ, वाराणसी आणि इतर ठिकाणी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रकल्प राबवण्यात आले.
भारतातील अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांना UNESCO विश्व वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न वाढवण्यात आले, ज्यामुळे भारताचा आध्यात्मिक वारसा जागतिक पातळीवर पोहोचला. संस्कृत आणि प्राचीन भारतीय ग्रंथांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम राबवण्यात आले, ज्यामुळे आध्यात्मिक जागरूकता वाढली, असेही अशोक चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.