Ashok Chavan News : अशोक चव्हाणांनी आपली ताकद दाखवली, मुदखेडमध्ये 20 वर्षांनी फुललं कमळ

Mudkhed Nagar Parishad Election : गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी नगराध्यक्षपदी अपक्ष मुजीब जहागीरदार निवडून आले होते. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील समीकरणं बदलत असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
Ashok Chavan Marathwada News
Ashok Chavan Marathwada NewsSarkarnama
Published on
Updated on

Mudkhed News : मुदखेड नगरपरिषद निवडणुकीत यंदा तब्बल वीस वर्षानंतर भाजपचे कमळ फुलले आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर कायम काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुदखेड नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह भाजपचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेस पक्षाचा इथे दारुण पराभव झाला आहे. मुदखेड नगरपरिषदेवर गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेसची पकड होती.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी नगराध्यक्षपदी अपक्ष मुजीब जहागीरदार निवडून आले होते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील समीकरणं बदलत असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. अशोक चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या मुदखेड नगरपरिषदेत अशोक चव्हाण यांनीच आता तो भाजपसाठी उद्धवस्त केला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु लोकसभेला मतदारांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला आणि भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने महाविकास आघाडीला व्हाईट वाॅश दिला. त्यानंतर मुदखेड नगर परिषदेत भाजपला (BJP) मिळालेला हा सर्वात मोठा विजय ठरत आहे. अशोक चव्हाण यांनी इथे प्रचार सभा घेतल्या होत्या.

Ashok Chavan Marathwada News
BJP Election News: भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष; पण विजयाचा गुलाल उधळण्याऐवजी बडा नेता पक्षावरच संतापला

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये असताना जसे एकहाती वर्चस्व नांदेड जिल्ह्यावर ठेवले होते. तेच आता भाजपमध्ये गेल्यावरही कायम ठेवण्यासाठी संपूर्ण ताकद या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत लावली होती. मुदखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार विश्रांती माधव कदम यांना 6889 तर काँग्रेस उमेदवार शीला राजबहादुर कोत्तावार यांना 5162 मते मिळाली. यामध्ये भाजपच्या विश्रांती कदम यांचा 1727 मतांनी विजयी झाल्या.

Ashok Chavan Marathwada News
NagarParishad Nivadnuk Nikal : भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची मशाल पेटली : नगरपालिकेवरही महाविकास आघाडीचा झेंडा

ना चालले चौधरी..ना राजप्पा!

मुदखेड शहरात काँग्रेस पक्षाची जवळपास 10 हजार मतदारांची व्होट बँक असताना काँग्रेस पक्षात माजी नगराध्यक्ष राम चौधरी आणि राजबहाद्दूर कोत्तावार यांची जादू चालली नाही. ज्यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोडसे यांना उमेदवारी नाकारली त्याचवेळी काँग्रेस पक्षाचा पराजय झाला होता, अशी चर्चा आता होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com