लक्ष्मीकांत मुळे
Nanded Politics : खासदार अशोक चव्हाण संस्थापक अध्यक्ष असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पंचवीस वर्ष ते अध्यक्ष होते. प्रकृती साथ देत नसल्यामुळे आपण अध्यक्षपद सोडत असल्याचे तिडके यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. मात्र डबघाईला आलेल्या साखर कारखान्याला शिस्त लावण्यासाठी अशोक चव्हाण यांनी अध्यक्षांचे अधिकार कमी केल्याच्या नाराजीतून तिडके यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते.
नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या राजकारणात सुरुवातीपासून गणपतराव तिडके हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. पंचवीस वर्षांपासून भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. पण आज अचानक त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्षांकडे दिला. या राजीनाम्याने राजकीय व सहकार क्षेत्रात एकच चर्चा सुरू झाली आहे. तिडके यांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ही जबाबदारी कोणावर सोपवतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना एक यशस्वी उद्योक समुह म्हणून ओखळला जातो. या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापनेपासूनचा काही वर्षांचा कालावधी सोडला तर गणपतराव तिडके हेच दिर्घकाळ अध्यक्ष राहिले आहेत. गेल्या काही वर्षांत भाऊरावची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने दोन कारखाने विकावे लागले. तर कारखान्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी लक्ष घालून प्रशासनावर वचक निर्माण केला.
तर निर्णय प्रक्रियेत कार्यकारी संचालकासोबत सल्लागार संचालकाची नियुक्तीही त्यांनी केली होती. भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्षांकडे दिला असून याची प्रत अशोक चव्हाण, साखर आयुक्त पुणे , प्रादेशिक सहसंचालकांना दिली आहे. अध्यक्ष या पदावर बऱ्याच वर्षापासून काम करत असुन आता माझी तब्येत साथ देत नाही. कारखान्याच्या प्रत्येक कार्यालयीन कामकाजात सहभागी होता येत नसल्यामुळे मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार. अशोकराव चव्हाणांनी मला दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आदरपूर्वक आभारी आहे. अध्यक्ष पदावर काम करत असताना मला माझे सहकारी उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक व अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. व माझ्या सुख दुःखात सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आसे समुद करुन राजीनामा स्वीकर करण्याची विनंती करण्यात आली आहे
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.