भाजपत गेल्यानंतर तीन-चार दिवसांत मला राज्यसभेवर पाठविण्यात आलं. आमदारचा खासदार झालो. हे सहसा घडत नाही. आता पक्षानं माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी व्यक्त केला.
भाजपत प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी ( 23 फेब्रुवारी ) नांदेड शहरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं प्रथम आगमन झालं. यानिमित्तानं त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. विमानतळ ते त्यांच्या शिवाजीनगरातील निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली. शिवाजीनगरातील निवासस्थान परिसरात एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, संजय देशमुख लहानकर, किशोर स्वामी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी अशोक चव्हाण म्हणाले, "पक्षाने खासदार करून काम करण्याची संधी दिली आहे .या संधीचा उपयोग नांदेडसह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी केला जाईल. भाजपत प्रवेश केल्यानंतर नऊ विधानसभा मतदारसंघांतून फोन आले. येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यासह खासदार, आजी, माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे."
"नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मी सत्तेत होतो, तेव्हा नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलं. यापुढेही करण्यात येणार आहे," असं चव्हाणांनी सांगितलं.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.