Ashok Chavan News : एका पराभवाने वासे फिरले, अशोक चव्हाणांना मोदींची भेट, पण चिखलीकरांना प्रवेश नाही

Ashok Chavan's entry for Modi's reception, Chikhlikar's name omitted : एका पराभवाने प्रताप पाटील चिखलीकर यांचे वासे फिरले असेच म्हणावे लागेल. अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता सोबत असताना झालेल्या पराभवाचे चटके चिखलीकरांनाच अधिक बसू लागले आहेत.
Ashok Chavan-PM Modi News
Ashok Chavan-PM Modi NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded BJP Politics News : राजकारणात एका पराभवाने काय घडू शकते? याचा अनुभव सध्या लोकसभेच्या नांदेड मतदारसंघाचे माजी भाजप खासदार प्रताप पाटी चिखलीकर हे घेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. काँग्रेस महाविकास आघाडीने ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकली. या विजयाला विशेष महत्व होते ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेले असतांना काँग्रेसने नांदेडची जागा आपल्याकडून खेचून घेतली होती.

या एका पराभवाने प्रताप पाटील चिखलीकर यांचे वासे फिरले असेच म्हणावे लागेल. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासारखा मातब्बर नेता सोबत असताना झालेल्या पराभवाचे चटके चिखलीकरांनाच अधिक बसू लागले आहेत. त्याचे झाले असे, की तीर्थक्षेत्र श्री पोहरादेवी येथील भेटीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल (ता.5) येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले होते. प्रोटोकाॅलनूसार प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी आणि पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना स्वागतासाठी प्रवेशिका दिल्या जातात.

प्रवेशिका कोणाला द्यायच्या याचा निर्णय जिल्ह्यातील प्रमुख नेते घेतात. आतापर्यंत देशातील महत्वाच्या नेत्यांच्या स्वागतासाठीच्या यादीत प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव आवर्जून असयायचे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात उमेदवार असल्यामुळे चिखलीकर यांना पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत करण्याची संधी मिळाली होती. पण काल पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ज्या भाजपच्या नेत्यांना प्रवेशिका देण्यात आल्या, त्या यादीतून चिखलीकरांचे नाव वगळण्यात आले होते.

Ashok Chavan-PM Modi News
Ashok Chavan News : पटोलेंच्या दणक्याने अशोक चव्हाण घायाळ, समर्थक नगरसेवकांच्या हकालपट्टीवर संतापले

राज्यसभेतील विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाण, डाॅ.अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणककर,भिमराव केराम, डाॅ. तुषार राठोड, राजेश पवार यांच्यासह जिल्ह्यातील स्थानिक काही पदाधिकाऱ्यांना मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावरील प्रवेशाच्या पासेस देण्यात आल्या होत्या. चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांना मात्र विमानतळ प्रवेशाचा पास देण्यात आला नव्हता. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्याची चिखलीकरांची संधी हुकली. आता यामागे नेमके काय राजकारण घडले? याचा शोध चिखलीकरांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, स्वागतासाठी उपस्थित राहणाऱ्या नेते, पदाधिकाऱ्यांची यादी भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून अंतिम करण्यात आल्याचे सांगितले जाते. भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी ही यादी जिल्हा प्रशासनाला दिली होती. मात्र ऐनवेळी ही यादी रद्द करून दुसरीच यादी अंतिम करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

Ashok Chavan-PM Modi News
Pratap Chikhlikar News : लोकसभेतील पराभवानंतर आता प्रतापराव चिखलीकर पुन्हा निवडणूक लढवणार; मतदारसंघही ठरला !

ही दुसरी यादी थेट प्रदेश कार्यालयातून प्रशासनाकडे देण्यात आली होती, असे सांगण्यात आले. आता प्रदेश कार्यकारणीतील चिखलीकरांचे नाव वगळणारा झारीतील शुक्राचार्य कोण? याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. एकूणच या प्रकारामुळे पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत गटबाजी समोर आल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com