Suresh Varpudkar : अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाने वरपूडकरांना परभणीत 'फ्री हँड'?

Suresh Varpudkar Parbhani Politics News : ...त्यामुळे वरपूडकरसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
Suresh Varpudkar
Suresh VarpudkarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Congress News : मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपत प्रवेश केल्याने नांदेड, हिंगोली व परभणी या शेजारील जिल्ह्यांत मोठी उलथापालथ होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. कारण या जिल्ह्यांतील अनेक नेत्यांचे अशोक चव्हाण हे हायकमांड होते. हायकमांडच भाजपमध्ये गेल्याने त्यांच्याशी निष्ठा असणारे काँग्रेस पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोलले जात होते.

मात्र, नांदेड वगळता हिंगोली जिल्ह्यातील आमदार डॉ. प्रज्ञा सातव, परभणी जिल्ह्यातील आमदार सुरेश वरपूडकर यांनी पक्षाशी निष्ठा ठेवून कुठेही न जाण्याचा निर्णय घेतला आहे. एका अर्थाने या नेत्यांना फ्री हँडच मिळाला आहे. कॉंग्रेस पक्षातून राजकीय क्षेत्रातील करिअरची सुरुवात करणाऱ्या सुरेश वरपूडकर यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांच्याशी निष्ठा राखत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Suresh Varpudkar
BRS News : 'बीआरएस' महाराष्ट्रात लोकसभा लढवणार ; KCR यांनी दिले संकेत!

राष्ट्रवादी कॉंग्रेस(NCP) पक्षात परभणी जिल्ह्यात वरपूडकर यांचा शब्द अंतिम असायचा. मात्र, अंतर्गत गटबाजीचे ग्रहण लागल्याने वरपूडकर यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन कॉंग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांचा पाठिंबा असल्याने वरपूडकर यांना पाथरी विधानसभेची उमेदवारीही मिळाली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 2019 मध्ये मात्र त्यांनी कॉंग्रेस(Congress) पक्षाचे उमेदवारी मिळवत पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजयश्री खेचून आणली. पक्षाने त्यांना प्रतोदपदी नियुक्त केले. दरम्यान, वरपूडकरांसाठी हायकमांड असलेल्या अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये(bjp) प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन करत वरपूडकरसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

Suresh Varpudkar
Mp Omraje Nimbalkar: ...अन् वडिलांच्या आठवणींनी ओमराजेंच्या अश्रूंचा बांध फुटला!

मात्र, वरपूडकर पक्षाशी एकनिष्ठ राहिले. जिल्ह्यातील पक्ष वर्तुळात माजी आमदार सुरेश देशमुख, युवा नेते सुरेश नागरे, माजी जिल्हाध्यक्ष बालकिशन चांडक यांचा प्रामुख्याने समावेश होतो. हे सर्व नेते वरपूडकर यांचे समकालीन आहेत. वरपूडकर यांचे त्यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षात पुन्हा एकदा वरपूडकर यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.

येत्या काळात लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असल्याने जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्याचे आव्हान सुरेश वरपूडकर यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने वरपूडकर यांना परभणी जिल्ह्यात फ्री हँडच मिळाला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com