BRS News : 'बीआरएस' महाराष्ट्रात लोकसभा लढवणार ; KCR यांनी दिले संकेत!

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत होणार
BRS, KCR
BRS, KCRSarkarnama
Published on
Updated on

KCR BRS News : तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्ष सावरत आहे. नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुलाबी वादळ निर्माण करण्याच्या तयारीला बीआरएस पक्ष लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BRS, KCR
Mp Omraje Nimbalkar: ...अन् वडिलांच्या आठवणींनी ओमराजेंच्या अश्रूंचा बांध फुटला!

नांदेड(Nanded) जिल्ह्यात गेल्या वर्षी फेब्रुवारीत बीआरएसची महाराष्ट्रातील पहिली सभा झाली होती. या सभेनंतर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बीआरएसमध्ये उड्या मारल्या. काही नेत्यांनी लोकसभा व‌ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती, पण या तयारीला व बीआरएसच्या विस्ताराला तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने ब्रेक लागला.

जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या बीआरएस(BRS)च्या वरिष्ठ नेत्यांची वाट पाहत आहेत. या वाट पाहून थकलेल्या नेत्यांसाठी एक आशेचा किरण दिसू लागला आहे. भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाला नांदेड जिल्ह्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते हैदराबादला गेले होते.

यानिमित्ताने राज्य‌ व जिल्ह्यातील राजकीय घडामोडींविषयी चर्चाही झाल्याचे समजते. नांदेड जिल्ह्यात जी पहिली सभा झाली, या सभेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे गणेश कदम केसीआर यांच्या वाढदिवसाला हैदराबादेत गेले होते. येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

BRS, KCR
Amit Deshmukh : काँग्रेस नेत्यांनी बळ दिल्यानंतर तरी अमित देशमुख सक्रिय होणार का ?

या बैठकीत लोकसभेच्या किती जागा लढवायच्या, कोणत्या जिल्ह्यात पक्षाची शक्ती आहे, आगामी विधानसभा निवडणूक या विषयावर चर्चा होणार असल्याचा दावा कदम यांनी 'सरकारनामा'शी बोलताना केला आहे. अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी बीआरएस पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेसची परिस्थिती नांदेड आणि मराठवाड्यात नाजूक झाली आहे. काँग्रेसच्या पारंपरिक मतदारात अस्वस्थता आहे. या संधीचा फायदा उचलण्यासाठी अनेक पक्ष तयारीला लागले आहेत. बीआरएस या संधीचा फायदा घेऊन नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुलाबी वादळ निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे.

नांदेड जिल्ह्यात माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, डॉ. यशपाल भिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, नागनाथ घिसेवाड, सुरेश दादा गायकवाड यांच्यासह चांगला जनसंपर्क असलेले नेते बीआरएसमध्ये आहेत. पक्षाने त्यांना बळ दिले तर नांदेड जिल्ह्यात बीआरएस पुन्हा उभारी घेऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com