Ashok Chavan : नांदेड जिल्ह्यातील यशानंतर अशोक चव्हाणांचे लक्ष्य आता स्थानिक स्वराज्य संस्था!

Ashok Chavan's Roadmap for Local Self-Governance in Maharashtra : मुलगी श्रीजया चव्हाण हिच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यात चव्हाण यांचा मोलाटा वाटा राहिला. विधानसभा निवडणुकीतील या यशाने अशोक चव्हाण यांना दहा हत्तींचे बळ आले आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : लोकसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात पक्षाच्या वाट्याला आलेल्या पराभवाने भाजप नेते खासदार अशोक चव्हाण अडचणीत आले होते. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लोकसभेतील पराभवाचे खापर चव्हाण यांच्या माथी फोडण्यात आले होते. पण अपयशाचा हा शिक्का अशोक चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाने पुसून टाकला.

मुलगी श्रीजया चव्हाण हिच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यात चव्हाण यांचा मोलाटा वाटा राहिला. (Ashok Chavan) विधानसभा निवडणुकीतील या यशाने अशोक चव्हाण यांना दहा हत्तींचे बळ आले आहे. शिवाय माजी खासदार व आता लोहा-कंधार मतदारसंघातून विजयी झालेले प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याने अशोक चव्हाण हेच भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते आहेत.

Ashok Chavan
Ashok Chavan : 'मी मुख्यमंत्री, त्यावेळी काँग्रेसच्या 82 जागा होत्या, पृथ्वीराजबाबांनी त्या 42 केल्या अन्‌ नानांनी 16 वर आणल्या'

नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी चार भाजप तर दोन जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. यात नायगाव, देगलूर, मुखेड आणि भोकर या (BJP)भाजपने तर शिवसेनेने नांदेड दक्षिण आणि उत्तर या जागा जिंकल्या आहेत. नांदेडमध्ये महायुतीने सगळ्या जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.

Ashok Chavan
Bjp News : भाजपच्या संकटमोचकाने सांगितलं मुख्यमंत्री शिंदेंना भेटण्यामागचं नेमकं कारण, म्हणाले...

लोकसभेच्या नांदेड पोटनिवडणुकीतही भाजपने जोरदार मुंसडी मारली. दिवंगत काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या सहानुभूतीच्या लाटेनंतरही भाजपच्या संतुकराव हंबर्डे यांचा केवळ 1457 मतांनी पराभव झाला. चार महिन्यात बदललेले हे चित्र महायुतीला सुखावणारे आहे.या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निकालानंतर आता अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे.

Ashok Chavan
Bhokar Assembly Election : विधानसभेत पहिले पाऊल टाकणाऱ्या श्रीजया चव्हाण यांना मंत्रीपदाची लाॅटरीही लागणार?

विधानसभा निवडणुकीच्या यशाबद्दल स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन अशोक चव्हाण यांनी केले आहे. कार्यकर्त्यांच्या एकीला, सामंजस्याला, परिश्रमामुळे विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. आता लक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashok Chavan
Nanded Loksabha By-Election : बाहेरच्यांना नांदेड पोरका वाटतो, पण अजून मी जिवंत आहे : अशोक चव्हाण

चला कामाला लागू ,एकजुटीने अथक परिश्रम करू, जनतेचा विश्वास सार्थ ठरवू आणि पक्ष संघटना मजबूत करू, असे आवाहन चव्हाण यांनी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना केले आहे. प्रत्येक बुथमध्ये तीनशे सदस्य करण्याचे लक्ष्य ठेवत चव्हाण यांनी भाजपच्या सदस्यता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com