Suresh Dhas: फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला टाळून शिलेदार धसांना उमेदवारी दिली; आष्टीत आता महायुतीत बंडखोरीचा पेच

Ashti Assembly Constituency Election 2024: पवारांनी स्वत:च भाजपचा त्याग केल्याने विजयसिंह पंडित यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. आष्टीचा पेच कायमच होता. सोमवारी भाजपच्या यादीत आष्टीची उमेदवारी सुरेश धस यांना जाहीर झाल्याने आमदार बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट झाला.
Ashti Assembly Constituency election 2024
Ashti Assembly Constituency election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : आष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपच्या पारड्यात पाडून घेतली. त्यांचे शिलेदार सुरेश धस यांना उमेदवारी मिळाली असून धस यांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्जही भरला.

माजी आमदार भिमराव धोंडे यांची उमेदवारी आणि आमदार बाळासाहेब आजबे यांचा अपक्ष उमेदवारी भरण्याच्या निर्णयामुळे आता ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे. महायुतीत मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

महायुतीत विधानसभेसाठी ज्यांचा आमदार त्यांचा उमेदवार हे सर्वसाधारण सुत्र ठरलेल्याचे सुरुवातीपासून सांगितले गेले. पंरतु, आष्टीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाळासाहेब आजबे आमदार तर गेवराईत भाजपचे लक्ष्मण पवार आमदार आहेत. मात्र, या दोन्ही जागांची भाजप-राष्ट्रवादीत अदलाबदलाची सुरुवातीपासून चर्चा होती.

Ashti Assembly Constituency election 2024
Pune Congress: शिवाजीनगरच्या उमेदवारीवरुन वाद ! काँग्रेस शहराध्यक्ष म्हणतात, '... तर मी राजकारणातून संन्यास घेतो...'

पवारांनी स्वत:च भाजपचा त्याग केल्याने विजयसिंह पंडित यांची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे जाहीर झाली. आष्टीचा पेच कायमच होता. सोमवारी भाजपच्या यादीत आष्टीची उमेदवारी सुरेश धस यांना जाहीर झाल्याने आमदार बाळासाहेब आजबे यांचा पत्ता कट झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठा करून आष्टी मतदारसंघ भाजपकडे सोडून घेता. परंतु, याच पक्षाचे माजी आमदार भिमराव धोंडे यांनी यापूर्वीच अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे.

आता आमदार बाळासाहेब आजबे यांनीही अपक्ष अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. आता महायुतीतील नेत्यांचे एकत्रीकरण करण्याचे आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहेत. आमदार पंकजा मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडेही लक्ष आहे.सुरेश धस यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com