Suryakanta Patil News : लोकसभेनंतर शरद पवार अॅक्शन मोडवर आहेत. विधानसभेसाठी पवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शरद पवार गटाकडून शिवसंकल्प यात्रा काढून सरकार विरोधात दंड थोपडले आहेत. महाविकास आघाडीला लोकसभेत चांगले यश मिळाले असले तरी गाफील न राहता विधानसभेसाठी काम करण्याचे आव्हान शरद पवार गटाकडून कार्यकर्त्यांना केले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमधून स्वगृही परतलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील या विधानसभा निवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण लोकसभा निवडणूक लढण्याची आपली इच्छा नसल्याचे सूर्यकांता पाटील यांनी सांगितले. मात्र, साहेबांनी आदेश दिले तर पाकिस्तानमधूनही निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे पाटील म्हणाल्या.
मी दहा वर्ष भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेल्या सूर्यकांता पाटील यांनी मी पुर्नस्वातंत्र्याचा आनंद घेत आहे, असे म्हटले. मी दहा वर्ष काहीच बोलले नाही. मात्र, आता पाहा सगळे माईक माझ्या जवळ आहेत. शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता पक्षात असताना मला हे द्या ते द्या, असे म्हणणे योग्य नाही, असे देखील सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
'अजित पवार, हर्षवर्धन पाटील यांनी माझा साखर कारखाना विकला. त्या पैशातून जिल्हा बँकेला वसुली करून दिली नाही. त्यांनी वनटाईम सेटलमेंट करून आमच्याकडून घ्यायला पाहिजे होते. पण वेळेवर त्यांनी ते घेतलं नाही. कारखानाही नाही, जमीनही नाही माझ्याकडे. त्यामुळे मी पैसे कोठून देणार.', असे देखील सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीत नांदेड आणि हिंगोलीत महायुतीचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर देखील भाजपला नांदेडमध्ये पराभव स्वीकारावा लागला. याआधी सूर्यकांता पाटील या नांदेड, हिंगोली लोकसभा मतदारसंघातून त्या तीनवेळा विजयी झाल्या आहेत. भाजपला राम राम करत त्यांनी शरद पवारांना साथ दिली आहे. त्यामुळे विधासभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये भाजप समोर मोठे आव्हान असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.