Chandrakant Patil on BJP Candidates : कोणत्या आधारावर 99 उमेदवार निवडले? ; चंद्रकांत पाटलांनी सांगितले भाजपचे निकष, म्हणाले...

Chandrakant Patil News: त्यापेक्षा एकही मत कमी होणार नाही. त्यामध्ये आणखी किती मतं वाढवता येईल यासाठी पुढील काही दिवस आम्ही प्रयत्न करणार आहोत.' असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

BJP Vidhan Sabha Candidates List: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. इच्छुकांच्या गर्दीतून हे 99 उमेदवार निवडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नाराजांची संख्या सध्या पाहायला मिळत आहे.

त्यामुळे कोणत्या निकषावर उमेदवार निवडण्यात आले याबाबत जाणून घेण्यास सर्वांनाच उत्सुकता आहे. अशातच भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार निवडताना कोणते निकष लक्षात घेण्यात आले त्याबाबत सांगितले आहे.

उमेदवारी घोषित झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) म्हणाले, ''कोथरूड मधून पुन्हा एकदा पक्षाने निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यामुळे आनंद झाला आहे. पुन्हा कोथरूडमधून संधी मिळेल, याबाबत विश्वास होता मात्र पक्षानेही जाहीर केल्यानंतर तो विश्वास अजून द्विगुणीत झाला असून पक्षाने दिलेली जबाबदारी सार्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.

लोकसभेला कोथरूड विधानसभा मतदारसंघातून जे 74500 मतांची आघाडी खासदार मुरलीधर मोहोळ यांना मिळाली त्यापेक्षा एकही मत कमी होणार नाही. त्यामध्ये आणखी किती मतं वाढवता येईल यासाठी पुढील काही दिवस आम्ही प्रयत्न करणार आहोत.''

Chandrakant Patil
BJP's first list for Maharashtra: पुण्यात पुन्हा विद्यमानांना संधी; तीन जागांचा सस्पेन्स अद्यापही कायम

भाजपचे(BJP) माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी देखील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती. त्याबाबत विचारला असता चंद्रकांत पाटील म्हणाले, 'अमोल बालवडकर हे पक्षाचे चांगले कार्यकर्ते आणि नेते आहेत ते पक्षाला नुकसान होईल असं काही करणार नाही. तसेच ते स्वतःचंही नुकसान करून घेणार नाही. काही दिवसांत ते पुन्हा एकदा आमच्या प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतील.' असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Chandrakant Patil
Pune Assembly Election : मुरलीधर मोहोळांनी तातडीने गाठले ‘शिवतीर्थ’; राज ठाकरेंशी गुफ्तगू, पुण्यासाठी काय असेल प्लॅन?

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितले की, 'उमेदवार निवडताना केंद्राकडून आणि राज्याकडून सर्वे करण्यात येतात यामधून काही गोष्टी समोर येतात. त्याचबरोबर केंद्राचा आणि राज्याचा सर्वे टॅली होणं आवश्यक असतं. तसेच पक्षनिष्ठा, नुसती आमदारकी नाहीतर पक्षासाठी आणि जनतेसाठी काम करणं, लोकांमध्ये इच्छुकाबाबत असलेली भावना अशा प्रकारचे वेगवेगळे निकष असतात. उमेदवारी मिळाली नाही ते या निकषात बसत नाहीत, असं म्हणता येणार नाही. पण यंदा उभ्या केलेल्या जागांच्या तुलनेत जास्त जागा निवडून आणायच्या असल्याने थोडं फुंकून पिण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.''

''उमेदवारी न मिळाल्याने बहुतांश मतदारसंघात काही नाराज आहेत. ज्यामध्ये बालवडकर, श्रीनाथ भिमाले यांचा समावेश आहे. मात्र ते पक्षाला डॅमेज करणार कोणतीही काम करणार नाही असा मला विश्वास आहे. जागांचा वाटप बाबत अद्याप चर्चा सुरू असल्याने त्या जागांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्या जागांवर ही लवकरच निर्णय होईल लोकसभेला काही प्रमाणात आमची पीछेहाट झाली असं बोललं जात असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बहुमत मिळू.'' असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com