ATS Action Beed : 'इस्लाम फाउंडेशन'च्या नावाने बनावट संस्था; बीडमध्ये एटीएसची कारवाई; दोघे ताब्यात

Islam Foundation Beed : अल हिंद सौतुल इस्लाम फाऊंडेशन अधिकृत नोंदणी असलेल्या संस्थेच्या नावाने बनावट संस्था दाखवून
ATS action in Beed after an alleged fake organization was created in the name of Islam Foundation; two people detained.
ATS action in Beed after an alleged fake organization was created in the name of Islam Foundation; two people detained.Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : गरीब, गरजू आणि लाचार व्यक्तींना मदत करण्याचा आभासी आव आणून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या भावनेशी खेळणाऱ्या एका भामट्या टोळीचा दहशतवाद विरोधी पथकाने बीडमध्ये पर्दाफाश केला आहे. अल हिंद सौतुल इस्लाम फाऊंडेशन या अधिकृत नोंदणी नसलेल्या बनावट संस्थेच्या नावाने देणगी गोळा करून स्वतःचे खिसे भरणाऱ्या दोन भामट्यांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात धडक कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर एटीएस युनिटचे सहायक पोलीस उपनिरीक्षक किसन सुखदेव सानप यांनी याप्रकरणी अधिकृत तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून इरफान शाहा गफ्फार शाहा (वय ३६, रा. गांधीनगर, बीड) आणि शहानवाज आयुब शेख (रा. दिलावर नगर, तेलगाव नाका, बीड) या दोघांवर फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. पेठ बीड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव बीडमधील स्वयंसेवी संस्थांची पाहणी करत असताना एटीएसला गुप्त बातमीदाराकडून या संशयित हालचालींची कुणकुण लागली होती. आरोपींनी २६ ऑक्टोबर २०२२ पासून कोणतीही वैध नोंदणी नसताना अल हिंद सौतुल इस्लाम फाऊंडेशन या नावाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पेजेस तयार केले होते. या अकाउंट्सवरून पाणीवाटप (पाणपोई) व गरिबांना मदतीचे भावनिक व्हिडिओ, पोस्ट शेअर करून देणगीदारांचा विश्वास संपादन केला जायचा. संस्थेच्या नावावर देणगी मागताना आरोपी अधिकृत बँक खात्याऐवजी स्वतःचे वैयक्तिक मोबाईल नंबर (9503129322, 9209151617) आणि वैयक्तिक यूपीआय क्यूआर कोड वापरत होते.

ATS action in Beed after an alleged fake organization was created in the name of Islam Foundation; two people detained.
Woman Corporator : गंभीर प्रश्नांवर चर्चा अन् महिला नगरसेवक मोबाईलवर ‘कँडी क्रश’ खेळण्यात बिझी; धक्कादायक Video व्हायरल

संशय बळावल्याने एटीएस अधिकाऱ्यांनी स्वतः १ सप्टेंबर २०२६ रोजी चाचणी म्हणून या क्यूआर कोडवर प्रत्येकी १०० रुपयांचे ऑनलाइन व्यवहार केले. तपासात हे सर्व पैसे थेट आरोपी इरफान शाहा व शहानवाज शेख यांच्या वैयक्तिक खात्यात जमा होत असल्याचे स्पष्ट उघडकीस आले.

आरोपींकडून संस्थेचे नावाचा गैरवापर

धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाकडून माहिती घेतली असता, या नावाशी मिळतेजुळते अल हिंद सौतुल इस्लाम मायॉरिटी एज्युकेशन अँड वेलफेअर फाऊंडेशन (नोंदणी क्र. एफ- २६१४१) वेगळेच असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी या नावाचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी देणगीदारांची उघड फसवणूक केली.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश केळी करत आहेत.

ATS action in Beed after an alleged fake organization was created in the name of Islam Foundation; two people detained.
BJP Corporator : सर्वसाधारण सभेत नादुरुस्त विद्युत दाहिन्यांचा धूर, भाजप नगरसेविकेचे वादग्रस्त वक्तव्य; ठेकेदाराला जिवंत जाळण्याची धमकी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com