Sandipan Bhumre Audio News : माझ्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, `त्या` कार्यकर्त्याचा भुमरेंवर आरोप...

Shivsena : घरावर हल्ला झाल्याची तक्रार वाघने पोलिसांत केल्यामुळे ठाकरेंचे आश्वासन हवेतच विरल्याची चर्चा सुरू आहे.
Minister Bhumre Viral Audio News
Minister Bhumre Viral Audio NewsSarkarnama

Marathwada : `माझ्या मुलाबद्दल फेसबुकवर काय पोस्ट टाकली, माजला का?`, असे विचारत मतदारसंघातील एका कार्यकर्त्याला फोनवरून शिवीगाळ केल्याचा पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर आरोप आहे. (Sandipan Bhumre Audio News) त्यात आता ज्या बाबासाहेब वाघ याला भुमरेंकडून शिवीगाळ झाल्याची आॅडिओ क्लीप व्हायरल झाली होती, त्या कार्यकर्त्याने भुमरेंवर आणखी एक आरोप केला आहे.

Minister Bhumre Viral Audio News
Imtiaz Jalil On Prakash Ambedkar : फडणवीसांनी हिमंत असेल तर आंबेडकरांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दाखवावा..

रात्री आपल्या घरावर हल्लाचा प्रयत्न झाल्याचा आरोप वाघ याने केल्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Shivsena) २५ जून रोजी रात्री काळ्या गाडीतून काही लोकांनी घराचा दरवाजा वाजवला. (Marathwada) हल्ल्याची शकत्या लक्षात घेवून मी तात्काळ ११२ नंबरला फोन लावला. त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेले लोक पळून गेले, असा दावा वाघ याने आपल्या तक्रारीत केला.

या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. (Paithan) पैठण मतदारसंघातील दरकवाडी येथील रहिवाशी बाबासाहेब वाघ यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्या पीएला फोन करून मंत्र्यांचे चिरंजीव विलास (बापू) भुमरे यांचे नाव घेवून भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. गावातील रस्ता न करताच बीलं उचलल्याचा गंभीर आरोप वाघ याने केल्यामुळे संदीपान भुमरे भडकले होते.

त्यांनी वाघ याला फोनकरून शिवीगाळ करत धमकावले होते. तसेच मी तुझ्या घरी येतो आणि सोय पाहतो, अशी धमकी देखील या आॅडिओ क्लीपमध्ये देण्यात आली होती. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर कार्यकर्त्यांचे बोलणे थेट उद्धव ठाकरेंशी करून दिले होते. तू घाबरू नकोस, शिवसैनिक तुझे संरक्षण करतील, असा शब्द देखील ठाकरेंनी दिला होता. मात्र घरावर हल्ला झाल्याची तक्रार वाघने पोलिसांत केल्यामुळे ठाकरेंचे आश्वासन हवेतच विरल्याची चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com