Imtiaz Jalil On Prakash Ambedkar : फडणवीसांनी हिमंत असेल तर आंबेडकरांविरुद्ध गुन्हा दाखल करुन दाखवावा..

Marathwada : अमरावतीच्या सभेत औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा कुठलाही प्रयत्न झाला नसतांना गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल करायला लावले.
Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis News, Marathwada
Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis News, MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

Aimim News : औरंगजेबाचे स्टेटस ठेवले म्हणून किंवा पोस्टर झळकावल्यामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या दंगली घडलेल्या नाहीत. काही किरकोळ प्रकार घडले असतील. (imtiaz Jalil On Prakash Ambedkar ) अमरावतीच्या सभेत औरंगजेबाच्या नावाने कुठल्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या. पोलिसांनी देखील हे मान्य केले, पण गृहमंत्र्यांचा दबाव असल्यामुळे काहीजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mp Imtiaz Jalil-Devendra Fadanvis News, Marathwada
Prakash Ambedkar News: 'संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या हाती देण्यासाठी कुणी मदत केली? आंबेडकरांचा सवाल

मग खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीला भेट देणाऱ्या (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची हिमंत गृहमंत्री फडणवीस दाखवणार आहेत का? असा सवाल खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीला भेट द्यायला गेले तर ते चालते, पण इम्तियाज जलील गेला तर त्याला देशद्रोही ठरवले जाते, असा आरोप देखील त्यांनी केला.

अमरावती येथे एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी काही तरुणांनी औरंगजेबच्या नावाने घोषणा दिल्याचा आरोप केला जातोय. (Devendra Fadanvis) पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आपण औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे राज्यात होणाऱ्या दंगली थांबल्याचा दावा केला. यावर इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलतांना मत व्यक्त केले.

औरंगजेबाच्या नावावरून राज्यात कुठेही मोठ्या दंगली झाल्या नाहीत. काही किरकोळ प्रकार घडले, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतरही शांत बसलेल्या भाजप आणि गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे. अमरावतीच्या सभेत औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा कुठलाही प्रयत्न झाला नसतांना गृहमंत्र्यांनी दबाव आणून काही मुलांवर गुन्हे दाखल करायला लावले. मग आंबेडकर तुमचे बाप आहेत का? त्यांच्याबद्दल वेगळा न्याय का? त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची हिमंत फडणवीस दाखवतील का? असेही इम्तियाज यांनी विचारले.

भिडे गुरूजी सारख्या सतत वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत देखील हे सरकार गप्प बसते. १५ आॅगस्ट हा देशाचा स्वातंत्र्यदिन नाही तो फाळणीचा काळा दिवस आहे, हे जर इम्तियाज जलील म्हणाला असता, तर काय झाले असते? या देशात कायदा सगळ्यांसाठी सारखा नाही. केवळ संशयावरून इथे मारहाण केली जाते, आणि पंतप्रधान अमेरिकेत जावून आमच्या देशात भेदभाव नाही, अस ढळढळीत खोट सांगतात, अशी टीका देखील इम्तियाज यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com