Aurangabad East Assembly Constituency: अतुल सावे यांच्या `होम मिनिस्टर`सह कुटुंबही प्रचारासाठी मैदानात

Atul Save family joined in election campaign: या विधानसभा मतदारसंघात सावे हे 2014 व 2019 असे दोन वेळा आमदार झाले आहेत. आता तिसऱ्यांदा ते मैदानात उतरले आहेत. यामुळे त्यांना तिसऱ्यांदा विजयी करून हॅटट्रिकचा संकल्प असल्याचे यावेळी कुटुंबीयांनी सांगितले.
Aurangabad East Assembly News
Aurangabad East Assembly NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : शहरातील विधानसभेच्या पूर्व मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अतुल सावे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ संपूर्ण सावे कुटुंबीय मैदानात उतरले आहे. पत्नी अंजली आणि सून ऐश्वर्या या घर सांभाळून त्यांचा प्रचार करीत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केवळ दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

त्यात मतदारसंघ मोठा असल्याने प्रत्येक ठिकाणी उमेदवाराला जाणे शक्य होत नाही. यामुळे अख्खे सावे कुटुंबीय प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. (Atul Save) सावे यांची दोन्ही मुले अजिंक्य आणि अनुराग सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडतात. विविध वॉर्डांत मतदारांच्या भेटी-गाठी, प्रचार कार्यालयात येणाऱ्यांशी संवाद असा त्यांचा दिनक्रम रात्री साडेबारा वाजता संपतो.

Aurangabad East Assembly News
Aurangabad East Assembly Constituency : 'यशस्वी व्हा'.. स्वामी गोविंददेव महाराजांचे हे शब्द विशेष ऊर्जा देणारे!

तब्बल साडेसतरा तास ते सक्रिय असतात. दुसरीकडे सावे यांच्या पत्नी अंजली आणि सून ऐश्वर्या या घरची कामे सांभाळत सकाळी नऊ ते एक आणि सायंकाळी पाच ते नऊ असे प्रचारात सक्रिय होतात. (BJP) यात विविध वॉर्डांतील प्रचारफेऱ्या, मतदारांच्या भेटीगाठी यांचा सामावेश आहे. सावे यांचे दोन्ही बंधू अनिल आणि अजित हेदेखील प्रचारात उतरले आहेत.

Aurangabad East Assembly News
BJP Manifesto : शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांसाठी दरमहा 2100 रुपये, भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा!

या विधानसभा मतदारसंघात सावे हे 2014 व 2019 असे दोन वेळा आमदार झाले आहेत. आता तिसऱ्यांदा ते मैदानात उतरले आहेत. यामुळे त्यांना तिसऱ्यांदा विजयी करून हॅटट्रिकचा संकल्प असल्याचे यावेळी कुटुंबीयांनी सांगितले.

Aurangabad East Assembly News
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या दहा वर्षात मतदारसंघात झालेली विकास कामे , त्यामुळे बदललेला चेहरा मोहरा लोकांना दिसतो आहे. या कामाची पावती मतदार नक्कीच देतील, असा विश्वास सावे कुटुंबीय व्यक्त करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com