Aurangabad East Assembly Constituency : 'यशस्वी व्हा'.. स्वामी गोविंददेव महाराजांचे हे शब्द विशेष ऊर्जा देणारे!

Blessings of Govind dev Giri Maharaj to Atul Save : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष प.पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची भेट घेऊन अतुल सावे यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी गोविंददेव गिरी महाराजांनी सावे यांना यशस्वी व्हा, असा आशिर्वाद देत शुभेच्छा दिल्या.
Atul Save News Aurangabad East
Atul Save News Aurangabad EastSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पुर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी नुकतीच रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची भेट घेऊन आशिर्वाद घेतल. यावेळी यशस्वी व्हा, असे आशिर्वाद महाराजांनी सावे यांना दिले. त्यांचे हे शब्द आपल्यासाठी उर्जा देणारे ठरल्याचे अतुल सावे यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष प.पू.स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची भेट घेऊन अतुल सावे (Atul Save) यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी गोविंददेव गिरी महाराजांनी सावे यांना यशस्वी व्हा, असा आशिर्वाद देत शुभेच्छा दिल्या.

Atul Save News Aurangabad East
Aurangabad East Assembly: माझ्या शहरात उद्योग आले पाहिजे, पन्नास हजार कोटींचे आले, आणखी आणणार!

तसेच सावे यांनी श्री शांतिगिरी महाराजांची देखील नुकतीच भेट घेतली. अध्यात्मिक शांती आणि ऊर्जेची अद्वितीय अनुभूती साधु संतांच्या दर्शन आणि मार्गदर्शनातून होत असल्याची भावना सावे यांनी व्यक्त केली. (BJP) संत जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर श्री शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जनशांती धर्म सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Atul Save News Aurangabad East
BJP Manifesto : शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांसाठी दरमहा 2100 रुपये, भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा!

"आपली एकजूट हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे" हा विचार सर्वांसाठी अंतर्मुख करणारा ठरला. महायुती सरकारने जी कामे केली ती अभूतपूर्व आहेत. महायुती सरकारच्या योजना सर्वसमावेशक तर आहेतच पण त्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यात सरकारला यश लाभले आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या गतिमान महायुती सरकारला पुन्हा एकदा बळकट करणे गरजेचे आहे, असे आवाहन अतुल सावे मतदारांना करत आहेत.

Atul Save News Aurangabad East
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

अतुल सावे यांनी पुर्व मतदारसंघातील विविध भागात पदयात्रा, बैठका, प्रचार सभा घेत दहा वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती देत पुन्हा संधी देण्याचे आवाहन करत आहेत. मतदारसंघात त्यांचे महिलांकडून स्वागत केले जात आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचे महिला त्यांना आवर्जून सांगताना दिसतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com