Aurangabad East Assembly: उद्धवसेनेच्या राजू वैद्य यांच्या माघारीने अतुल सावे रिलॅक्स! खैरेंचे मानले आभार

Uddhav Sena candidate Raju Vaidy withdraws Atul Save relieved: सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलील यांना मताधिक्य मिळाले होते. अशावेळी विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांमध्ये होणारे विभाजन अतुल सावे यांना परवडणारे नव्हते.
Atul Save, Chandrakant Khaire
Atul Save, Chandrakant KhaireSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू वैद्य यांनी काँग्रेसच्या लहू शेवाळे यांच्या विरोधात भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज काल शेवटच्या दिवशी माघारी घेतला. राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी आहे. त्यामुळे राजू वैद्य यांची ही माघार खरंतर काँग्रेसच्या लहू शेवाळे यांच्यासाठी घेतली गेली, मात्र याचा सर्वाधिक आनंद झाला तो भाजप महायुतीचे अतुल सावे यांना.

सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एमआयएम चे उमेदवार इम्तियाज जलील यांना मताधिक्य मिळाले होते. अशावेळी विधानसभा निवडणुकीत हिंदू मतांमध्ये होणारे विभाजन अतुल सावे (Atul Save) यांना परवडणारे नव्हते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असलेल्या राजू वैद्य यांची उमेदवारी कायम राहिली असती तर याचा फटका अतुल सावे यांना बसला असता.

मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजू वैद्य यांनी आपला अर्ज काढून घेतला. याची माहिती अतुल सावे यांना मिळताच ते रिलॅक्स झाले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या पाया पडत साऱ्यांनी त्यांचे आभार मानले आणि आशीर्वादही घेतले. शिवसेना- भाजपची युती असतांना अगदी सुरुवातीपासून चंद्रकांत खैरे आणि अतुल सावे यांचे वडील दिवंगत मोरेश्वर सावे यांनी शिवसेनेत अनेक वर्ष एकत्रित काम केले होते.

Atul Save, Chandrakant Khaire
Aurangabad East Assembly: माझ्या शहरात उद्योग आले पाहिजे, पन्नास हजार कोटींचे आले, आणखी आणणार!

त्यामुळे सावे आणि खैरे यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजू वैद्य यांच्या माघारी नंतर सावे यांनी कदाचित यामुळेच खैरे (Chandrakant Khaire) यांचे आभार मानले असावेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. दुसरीकडे एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या मतांमध्ये विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता 26 पैकी पंधरा मुस्लिम उमेदवार मैदानात असल्याने वाढली आहे.

एकूणच काँग्रेसने ऐनवेळी बदललेला उमेदवार, इम्तियाज जलील यांच्या पूर्व मधून लढण्याच्या निर्णयानंतर वंचितच्या अफसर खान यांची झालेली एन्ट्री आणि एकूण 15 मुस्लिम उमेदवार यामुळे भाजपच्या अतुल सावे यांचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com