

तमिळनाडूच्या राजकारणात मोठं यश मिळवल्यानंतर थलपती विजय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अभिनेता म्हणून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या विजयने चित्रपटसृष्टीतून राजकारणात दमदार एन्ट्री केली.
नुकत्याच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवत राज्याच्या राजकारणात नवा इतिहास घडवला. त्याच्या पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्यानंतर आता तमिळनाडूमध्ये TVK चे सरकार स्थापन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे विजयच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, या आनंदाच्या क्षणीच विजयवर दुःखाचा डोंगर कोसळला. चित्रपटसृष्टीतील त्याच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं अचानक निधन झाल्यानं विजय पूर्णपणे हादरला आहे.
तामिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते आर. बी. चौधरी यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. प्रसिद्ध निर्माता आरबी चौधरी यांचं 5 मे 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे भीषण कार अपघातात निधन झालं. या घटनेनंतर संपूर्ण दक्षिण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आरबी चौधरी हे तामिळ चित्रपटसृष्टीतील मोठं नाव मानलं जात होतं. अनेक नवोदित कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना त्यांनी संधी देत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. विजयच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातही त्यांनी मोठा पाठिंबा दिला होता. त्यामुळे विजय आणि चौधरी कुटुंबीयांमध्ये अत्यंत जवळचे संबंध होते.
आरबी चौधरी यांच्या अंत्यदर्शनासाठी विजय स्वतः उपस्थित राहिला होता. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्टपणे दिसून येत होतं. या कठीण प्रसंगी विजयने चौधरी कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः आरबी चौधरी यांचा मुलगा जीवा विजयला मिठी मारून अक्षरशः रडू लागल्याचं पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी आलं. हा भावनिक क्षण अनेकांना हेलावून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.