मोठी बातमी : फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याच्या सख्ख्या भावालाच मारहाण; जमिनीचा वाद पेटला, भाऊ अन् पुतण्यावर उपचार सुरू

Atul Save family attack News : ही घटना पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

chhatrapati sambhajinagar News : शेती व रस्त्याच्या वादातून राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांचे सख्खे बंधू व पुतण्याला मारहाण करण्यात आली. यामध्ये दोघेजणही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बिडकिन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव खंडेवाडी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस आणि जबाब नोंदवला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे शेतीच्या वादावरुन एका गटाने ओबीसी मंत्री अतुल सावे यांचे सख्खे बंधू व पुतण्याला मारहाण केली. अजित मोरेश्वर सावे (७०),अमेय अजित सावे (वय ३५, रा. खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर) अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव खंडेवाडी परिसरात शेतीच्या हद्दी तसेच रस्त्याच्या वापरावरून दोन गटांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून दोन्ही बाजूमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर एका गटाकडून अमेय सावे आणि अजित सावे यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. हे दोघे जणही मारहाणीत जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.

BJP
Maharashtra Politics Live Update : ओबीसी समाजाकडून १ सप्टेंबरला 'चलो मुंबई'ची घोषणा; राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार

या घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, अमेय सावे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मारहाणीचे नेमके कारण आरोपींची संख्या आणि घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

BJP
NCP News : नवाब मलिकांना मोठा धक्का : आधी आमदारकी गेली, आता घरातून नगरसेवक पदाची वजाबाकी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com