Aurangabad District Bank : जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी अर्जुन गाढे; सूत्रधार सत्तार...

Shivsena News : गुप्त बैठकीत अनेक संचालकांचे रुसवे-फुगवे, विरोध सत्तारांनी मोडीत काढले आणि गाढे यांच्या नावावर सहमती मिळवली.
Aurangabad District Bank News
Aurangabad District Bank NewsSarkarnama

Aurangabad Political News : औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदी आधी उपाध्यक्ष असलेल्या अर्जुन गाढे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (District Bank News) आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्जुन गाढे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. माजी अध्यक्ष नितीन पाटील यांनी महिनाभरापूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा अर्जुन गाढे उपाध्यक्ष होते.

Aurangabad District Bank News
Tanaji Sawant Visit Protester : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का ? आंदोलकांचा सावंतांना सवाल...

आता सत्तारांच्या आशीर्वादाने त्यांना अध्यक्षपदी बढती मिळाली आहे. गाढे अध्यक्ष झाले असले तरी बॅंकेची सगळी सूत्रं सत्तारांच्या हाती असणार हे या निवडीवरून स्पष्ट झाले आहे. (Aurangabad) पालकमंत्री संदीपान भुमरे हेदेखील अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा होती, तसे प्रयत्नदेखील सुरू होते. परंतु अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बॅंकेवरील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सगळ्या संचालकांना आपल्या बाजूला वळवत अर्जुन गाढे यांना अध्यक्षपदी बढती देत बाजी मारली.

माजी अध्यक्ष नितीन पाटील आणि सत्तार यांच्यात बिनसल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणण्यात आला होता. पाटील यांनीदेखील अध्यक्षपदाचा राजीनामा देत बाजूला होणे पसंत केले. (Marathwada) त्यानंतर अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू होती. आज प्रत्यक्ष निवडणूक झाली, परंतु अध्यक्षपदासाठी गाढे यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी सत्तार-भुमरे यांच्यातच खरी चुरस होती.

काल झालेल्या गुप्त बैठकीत अनेक संचालकांचे रुसवे-फुगवे, विरोध सत्तारांनी मोडीत काढले आणि गाढे यांच्या नावावर सगळ्यांची सहमती मिळवली. त्यामुळे आज फक्त निवडणुकीचा सोपस्कार पार पाडण्यात आला. अब्दुल सत्तारांनी पुन्हा एकदा जिल्हा बॅंकेची सूत्रं आपल्याच हाती ठेवण्यात यश मिळवले आहे. अर्जुन गाढे हे जरी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसणार असले तरी सत्तारांच्या मर्जीशिवाय जिल्हा बॅंकेतील एकही कागद इकडचा तिकडे हलणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

अर्जुन गाढे हे सिल्लोड तालुक्यातील कोटनांद्रा येथील रहिवाशी असून, अब्दुल सत्तार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, कोटनांद्रा गावचे सरपंच राहिलेल्या गाढे यांना सत्तारांनी वर्षभरापूर्वी थेट जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष केले होते. विविध विकास कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून अर्जुन गाढे संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. नितीन पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर गाढे यांच्याकडे चेअरमन पदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला होता.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com