Aurangabad District Bank Election: औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला, विजयाचा गुलाल कोण उधळणार?

Aurangabad DCC Bank Election 2026: औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीसाठी शनिवारी (ता.4 जुलै) उत्साहात मतदान पार पडले 1053 पैकी 1048 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेसाठी 99 टक्के मतदान झाल्यानंतर आता सत्ता कोणाची? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Aurangabad District Bank
Aurangabad District BankSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Vs mahavikas agadi : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकारण तापले होते. 20 जागांपैकी 7 संचालक बिनविरोध निवडून आणत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने या निवडणुकीत आधीच बाजी मारली आहे. तर काँग्रेससह राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या महाविकास आघाडी प्रणित भूमिपुत्र शेतकरी बचाव पॅनलचा एक एक संचालक बिनविरोध निवडून आला आहे.

औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीसाठी शनिवारी (ता.4 जुलै) उत्साहात मतदान पार पडले 1053 पैकी 1048 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेसाठी 99 टक्के मतदान झाल्यानंतर आता सत्ता कोणाची? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 8 वाजेपासून मतदान शांततेत सुरू झाले. सायंकाळी चार वाजेपर्यंत 99.53 टक्के मतदान झाले. उद्या (ता. 5) सकाळी 8 वाजेपासून जिल्हा बँकेच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे.

जिल्हा बँकेचे आठ संचालक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्राथमिक कृषी पतपुरवठा वि.का.स. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून बिनविरोध वगळता कन्नड, गंगापूर, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर या चार तालुक्यांत 4 जागांसाठी, तर बिगर शेती मतदारसंघ 5, महिला प्रतिनिधी 2 आणि इतर मागास वर्गीय सदस्य 1 अशी एकूण 12 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली.

Aurangabad District Bank
Priyank Kharge News: मोठी बातमी: कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांना न्यायालयाचा दणका; 'RSS'बाबतचा दावा खोडून काढला, दिला महत्त्वाचा आदेश

यासाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राज्याचे मंत्री अतुल सावे,खासदार डाॅ. कल्याण काळे, आमदार अनुराधा चव्हाण, संजना जाधव यांचा समावेश आहे. सकाळी मंत्री सावे यांनी शहरातील जिल्हा निबंध कार्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला. खासदार डाॅ. कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे यांनीही मतदान केले.

सावे- दानवे केंद्रावर ठाण मांडून

मंत्री अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, माजी अध्यक्ष नितीन पाटील हे मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केंद्र परिसरातच ठाण मांडून होते. प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंध कार्यालयात मतदान शांततेत पार पडले. यावेळी महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्यांत खेळीमेळीत राजकीय टोलेबाजीही रंगलेली दिसून आली.

Aurangabad District Bank
Union Cabinet Expansion: दिल्लीत शिंदेंचा मोठा गेम प्लॅन! शिवसेनेच्या कोट्यातील 2 मंत्रीपदांसाठी 'हे' 5 दिग्गज शर्यतीत; सस्पेन्स वाढला, कोणाला मिळणार संधी?

पाच तालक्यांत शत-प्रतिशत मतदान

तालुकानिहाय 9 केंद्रावर मतदान झाले. त्यात खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव, कन्नड आणि गंगापूर तालु्क्यात 100 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत 12 जागांसाठी महायुतीकडून बिगर शेती मतदारसंघातून रविंद्र काळे, आमदार अंबादास दानवे, अर्जून पाटील, मंत्री अतुल सावे, तर महिला राखीव मतदारसंघातून आमदार अनुराधा चव्हाण, मुक्ता तांगडे, इतर मागास वर्गीय सदस्य मतदारसंघातून सुवर्णा जाधव नसीब आजमावत आहेत.

प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघांतर्गत छत्रपती संभाजीनगरातून अभिजित देशमुख, कन्नडमधून आमदार रंजना जाधव, सिल्लोडमधून प्रभाकर काळे, तर गंगापूरमधून शेषराव जाधव रिंगणात आहेत. विरोधात महाविकास आघाडीला ९ जागांवरच उमेदवार उभे करता आहे. त्यात खा. डाॅ. कल्याण काळे, राजू पोळ, जगन्नाथ काळे, बाबुराव पवार, प्रणिकेत पाटील, दादाराव वानखेडे, निलिमा डोणगावकर यांचा समावेश असून अॅड. देवयानी डोणगावकर या दोन जागांवर लढत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com