Election Results 2024 : विजयाचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय जल्लोष करणार नाही! खैरेंना भलतीच धाकधूक...

Lok Sabha Election Results Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबाद मतदारसंघात विजय होईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
Chandrakant Khaire, Uddhav Thackeray
Chandrakant Khaire, Uddhav ThackeraySarkarnama

Jagdish Pansare jp-75

Chhatrapati Sambhajinagar :  लोकसभा निवडणुकीत जोपर्यंत विजयाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत कुठेही जल्लोष फटाके फोडू नका, अशा सूचना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. विजयी जल्लोष मातोश्रीवर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये चंद्रकांत खैरे विजयी होणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतरही चंद्रकांत खैरे यांच्या पोटात गोळा आला आहे. निकाल हाती येईपर्यंत ही धाकधूक कायम राहणार असल्याचे दिसते.

धाकधूक असायला हवी, ओव्हर कॉन्फीडन्समध्ये जाणार नाही, असे म्हणत खैरेंनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. खैरे यांची थेट लढत महायुतीचे संदीपान भुमरे यांच्याशी झाली. निवडणूक निकालाला काही तास शिल्लक असताना खैरेंनी घरी देवासमोर बसून प्रार्थना सुरू केली आहे.

विशेष म्हणजे खैरेंनी देवघरात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेली मशाल ठेवली आहे. देवावर माझा विश्वास आहे, श्रध्दा आहे. चांगल्या भावनेने केलेली प्रार्थना परमेश्वर निश्चितच स्वीकारत असतो. देवाच्या आशिर्वादानेच मी नगरसेवक, दोन वेळा आमदार, सलग चारवेळा खासदार म्हणून निवडून आलो. गेल्यावेळी थोडी चूक झाली, पण यावेळी ती होणार नाही, असा विश्वास खैरेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray
Aurangabad Lok Sabha Constituency : चंद्रकांत खैरेंना लोकसभेत जाण्याची शेवटची संधी मतदार देणार का ?

दर निवडणुकीनंतर निकालाच्या आधी चंद्रकांत खैरे हे देवाची उपासना करत असतात. रविवारी त्यांनी सलग आठ तास दौलताबाद घाटातील दक्षिणमुखी मारुती मंदिरात यज्ञ केला होता. आज सोमवार असल्याने ते वेरुळच्या घृष्णेश्वराला अभिषेक घालणार आहेत.

एक्झिट पोलने विजयाचा अंदाज वर्तवला असला तरी खैरे उत्साहाच्या भरात कुठलेही सेलिब्रेशन करणार नाहीत. विजयाचे प्रमाणपत्र हातात येईपर्यंत आपण संयम राखणार आहोत, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही मी हेच सांगितले असल्याचे खैरे म्हणाले.

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray
Aurangabad Lok Sabha Constituency : भुमरेंना एकनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळणार का ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com