MNS : अमित ठाकरेंचा आजपासून दहा दिवस मराठवाड्यात मुक्काम

राज ठाकरे यांच्या मनसेकडे तरुणांचा कल सर्वाधिक असल्यामुळे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी ताकद मनसेच्या मागे उभी राहू शकते. (MNS, Amit Thackeray)
MNS Youth Leader Amit Thackeray In Marathwada News
MNS Youth Leader Amit Thackeray In Marathwada NewsSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : राज्यात काल मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यांची चर्चा सुरू असतानांच मनसे विद्यार्थी सनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आजपासून दहा दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. या दहा दिवसांत संपुर्ण मराठवाडा (Marathwada) पिंजून काढत ते विद्यार्थी सेनेची नव्याने बांधणी करणार आहेत. वैयक्तिक भेटीगाठींसह काही प्रवेश सोहळे देखील या दौऱ्यात होणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दौऱ्यात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक भेटीगाठी ते घेणार आहेत. विद्यार्थी सेनेत मोठ्या प्रमाणावर नव्या कार्यकर्त्यांचे प्रवेश देखील होणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणीसाठी हा मराठवाडा दौरा असल्याचे मनसेच्या वतीने कळवण्यात आले आहे. राज ठाकरे शिवसेनेत असतांना विद्यार्थी सेनेची स्थापना करण्यात आली होती. राज ठाकरे हेच विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष देखील होते. त्याकाळात विद्यार्थी सेना प्रचंड सक्रीय होती. शिकलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज ठाकरे यांनी शिव उद्योग सेनेची शाखा देखील काढली होती.

बेरोजगार तरूणांचा या नव्या सेनेला चांगला प्रतिसाद देखील मिळत होता. अनेक कंपन्यांमध्ये तेव्हा तरुणांना नोकऱ्या दिल्या जायच्या. परंतु कालांतराने या दोन्ही सेना पुढे बंद झाल्या. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर तर विद्यार्थी सेना नावालाच उरली होती.

आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणीचा प्रयत्न केला, पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्यांनी आपला फोकस युवासेनेवर केंद्रीत केला होता. आता राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या विद्यार्थी सेनेला मनसेच्या माध्यमातून पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न त्यांचे चिरंजीवर अमित ठाकरे हे करू पाहत आहेत.

MNS Youth Leader Amit Thackeray In Marathwada News
Dasara Melawa : तुमच्या प्रेम आणि आशिर्वादाने भरून पावले..

राज ठाकरे यांच्या मनसेकडे तरुणांचा कल सर्वाधिक असल्यामुळे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी ताकद मनसेच्या मागे उभी राहू शकते. या हेतूने अमित ठाकरे मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे यांच्याकडे तरुण नेतृत्व म्हणून पाहिले जाते. गेल्या काही महिन्यांपासून ते मनसेत सक्रीय झाले आहेत. त्यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर मनसे विद्यार्थी सेनेत अमुलाग्र बदल झालेले दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com