Aaurangabad Municipal Corporation : औरंगाबाद महापालिकेत खळबळ; १९ कर्मचार्यांचं तडकाफडकी निलंबन

Aaurangabad Municipal Corporation : कारवाईच्या बडग्यामुळे कर्मचाऱ्यांत खळबळ
Aaurangabad Municipal Corporation
Aaurangabad Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेतील प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी पदभार घेतल्यापासून महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कामचुकार, लेटलतिफ व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर त्यांनी आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. (Aaurangabad Municipal Corporation)

औरंगाबाद( Aaurangabad) महापालिकेत आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दांडीबहाद्दर व लेटलतिफ कर्मचाऱ्यांवर पहिल्यांदाच कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना देवूनही गैरहजर राहणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांना निलंबित (Suspension) करण्याचे आदेश सोमवारी (ता. १९) काढण्यात आले आहेत. दोन कर्मचारी कंत्राटी तर १९ कर्मचारी महापालिकेच्या आस्थापनेवरील असल्याची माहिती समोर आली आहे.

Aaurangabad Municipal Corporation
Anil Deshmukh : स्वीय सहायकासोबतच देशमुख आज कारागृहाबाहेर येणार का ?

महापालिकेत मुख्यालयासह प्रभाग कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर असतात. त्यामुळे डॉ. चौधरी यांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आदेश दिले होते. कायम गैरहजर राहणाऱ्यांना नोटीसही देण्यात आली होती.

Aaurangabad Municipal Corporation
Amruta Fadnavis : महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता..!''

विशेष म्हणजे नऊ झोन कार्यालयातील अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले. सोमवारी याचा अहवाल डॉ. चौधरी यांनी मागविला व कायम गैरहजर राहणाऱ्या १९ कायम तर दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. यातील बहुतांश कर्मचारी हे वर्ग चारचे आहेत, असे सूत्रांनी सांगितले. डॉ. चौधरी यांच्या कारवाईच्या बडग्यामुळे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com