Anil Deshmukh : स्वीय सहायकासोबतच देशमुख आज कारागृहाबाहेर येणार का ?

Anil Deshmukh : सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार झाला आहे.
Anil Deshmukh and Parambir Singh
Anil Deshmukh and Parambir SinghSarkarnama

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे. (Anil Deshmukh latest news)

गेल्या १२ तारखेला त्यांना जमीन मंजूर करण्यात आला होता. पण सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतल्याने त्यांच्या जामीन अर्जाला मुंबई न्यायालयाने १० दिवस स्थगिती दिली होती. आज (ता.२१) त्यावर सुनावणी होणार आहे.

देशमुख यांच्या जामीनावरील स्थगिती ता. ३ जानेवारीपर्यंत ठेवावी, असे सीबीआयने कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले आहे, यावर आज सुनावणी आहे. देशमुख यांची १२ डिसेंबर रोजी सुटका केली होती.

अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांना अद्याप ही जामीन मिळालेला नाही. अनिल देशमुख यांना ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. या प्रकरणात सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार झाला आहे.

ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.

Anil Deshmukh and Parambir Singh
Grampanchayat Election Result : राज्यात भाजप नंबर एक, ठाकरे गटाचा धुव्वा

देशमुखांना ईडीच्या तपासात जामीन मिळाला आहे. आता त्यांना सीबीआय प्रकरणात जामीन मिळेल की नाही, हे दुपारी समजेल.काही दिवसापूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पालांडे यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काल (मंगळवारी) जामीन मंजूर झाला आहे. ते आज कारागृहाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.

देशमुखांवर अशी झाली कारवाई

  • मार्च २०२१ - परमबीर सिंह यांचे १०० कोटी वसुलीबाबतचे पत्र

  • ५ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

  • १४ एप्रिल रोजी अनिल देशमुख सीबीआय चौकशीला हजर, ९ तास झाली होती चौकशी

  • ५ जून रोजी हजर राहण्याचे पहिले समन्स

  • २५ जून रोजी देशमुखांच्या नागपूर व मुंबईतील घरावर छापे

  • २६ जून रोजी देशमुखा़ंना दुसरे समन्स

  • ५ जुलै रोजी हजर राहण्याबाबत तिसरे समन्स

  • १६ जुलै रोजी देशमुखांची ४ कोटीची संपती जप्त केली (जप्तीमध्ये वरळीतील घर व उरणच्या धुतुम गावातील जमीनीचा समावेश)

  • १८ जुलै रोजी अनिल देशमुखांच्या नागपूरच्या काटोल येथील घरावर ईडीचे छापे

  • ३० जुलै अनिल देशमुखने ईडी विरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली

  • १६ आँगस्ट अनिल देशमुखाची याचिता सुप्रिमकोर्टाने फेटाळली

  • १८ आँगस्ट रोजी अनिल देशमुख यांना चौथं समन्स, आँगस्ट महिन्यातच ५वे समन्स बजावले

  • २ सप्टेंबर रोजी सीबीआयचा अनिल देशमुखांचा अहवाल झाला लिक

  • देशमुख चौकशीला हजर राहत नसल्यामुळे ५ सप्टेंबर रोजी ईडीची लूक ऑऊट नोटीस

  • ३० आँक्टोंबर मुंबई उच्च न्यायालयाने ईडी विरोधात अनिल देशमुखाची याचिका फेटाळली.

  • १२ डिसेंबर रोजी जामीनाला दहा दिवस स्थगिती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com