Aurangabad West Assembly Election : माझ्या मागे आता ठाकरे ब्रॅड, मैदान मारणारच- राजु शिंदे

Aurangabad West Assembly Election : असली आणि नकली शिवसेना कोणती याचा फैसला येत्या २० तारखेला मतपेटीतून करायचा
Raju Shinde
Raju ShindeSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad West Assembly Election : औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे यांनी विद्यमान आमदारावर जोरदार टिका करुन मागच्यावेळीच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती, आतातर माझ्या मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा ब्रॅण्ड आहे. पश्चिमच्या मुजोर आमदाराला घरी पाठवण्यासाठी मी आलो आहे.

असली आणि नकली शिवसेना कोणती याचा फैसला येत्या २० तारखेला मतपेटीतून करायचा आहे. जसा माझा वॉर्ड नंबर एक केला तसा मतदारसंघही करीन, अशी ग्वाही शिवसेना महाविकास आघाडीचे औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार राजु शिंदे यांनी दिली.

संभाजीनगर शहरातील पश्चिम, मध्य व पुर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संभाजीगरात जाहीर सभा पार पडली.

Raju Shinde
Aurangabad Central Assembly Election: ना बटेंगे ना कटेंगे, हम जुडेंगे और जितेंगे : बाळासाहेब थोरात

या सभेत राजु शिंदे यांनी भाषण करत विरोधकांवर टीका केली. सभास्थळी मशालीचे चिन्ह असलेला भगव्यासह झेंड्यासह महाविकास आघाडीत सहभागी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसचे झेंडे, निळे, लाल आणि पांढरे झेंडे सर्वत्र लावण्यात आले होते.

स्टेजच्या समोर प्रेक्षकांमध्ये अनेक ठिकाणी हातात पेटत्या मशाली घेऊन उभे असलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. औरंगाबाद पश्चिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार राज शिंदे भाषण करताना समर्थक पश्चिमका आमदार कैसा हो राजू शिंदे जैसा हो, अशा घोषणा देत होते.

तसेच त्यांचे पोस्टर दाखवले जात होते. नेत्यांची भाषणे सुरु होण्यापूर्वी पन्नास खोके एकदम ओके हे लोकनाट्य सादर करण्यात आले. सर्वसामान्यांना भेडसावणारे अनेक प्रश्न, बंडखोरी करुन गेलेल्यांवर व राज्यातील सरकारवर यातून जोरदार टीका करण्यात आली.  

माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, फिरोज पटेल, अनिल चोरडिया, सुनील शिंदे आदींनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. बिशप आर.बी. गायकवाड यांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याचे पत्र दिले. आंबेडकरवादी संविधान बचाव समितीच्यावतीने आघाडीला राजू शिंदे यांना पाठींबा देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com