Aurangabad Central Assembly Election: ना बटेंगे ना कटेंगे, हम जुडेंगे और जितेंगे : बाळासाहेब थोरात

Aurangabad Central Assembly Election: गद्दारांना मताच्या माध्यमातून शिक्षा देवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आशिर्वाद द्या,
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on: 
Updated on: 

Aurangabad Central Assembly Election: मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, निष्ठावंतांची ही सभा आहे. पण विरोधकांकडून बटेंगे तो कटेंगे असे म्हणत खोटा नरेटिव्ह पसरवला जात आहे. पण ना कटेंगे ना बटेंगे, हम जुडेंगे और जितेंगे, असा विश्वास शिवसेना महाविकास आघाडीचे औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संभाजीनगर शहरातील पश्चिम, मध्य व पुर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संभाजीगरात जाहीर सभा पार पडली.

या सभेत उमेदवार म्हणून बाळासाहेब थोरात यांनी भाषण केले. डॉ. बाळासाहेब थोरात यांनी आपण निष्ठावंत शिवसैनिक म्हणून इथे जमलो आहोत. आता ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नरेटीव पसरवला जात आहे, मात्र `हम ना बटेंगे, ना कटेंगे. हम जुडेंगे और जितेंगे`असा  विश्वास व्यक्त करुन सर्वांना एकजूट होण्याचे आवाहन केले.  

Balasaheb Thorat
Hemant Rasane: क्रीडा धोरणाची करणार प्रभावी अंमलबजावणी

मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर झालेल्या या सभेत गद्दारांना धडा शिकवा आणि निष्ठावंतांना संधी द्या, असे आवाहन थोरात यांनी आपल्या भाषणात केले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांना धोका देणाऱ्यांना देवही माफ करणार नाही.

हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे गद्दारांना नामशेष करा, असे आवाहन त्यांनी केले. गद्दारांना मताच्या माध्यमातून शिक्षा देवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आशिर्वाद द्या, असे खैरे म्हणाले.  

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यातील सरकारने मराठवाडा आणि संभाजीनगरकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. यावेळी जिल्ह्यातील नऊही विधानसभा मतदार संघात महाविकास आाघाडीचे उमेदवार निवडून देऊन विकासासाठी मतदारांनी आघाडीला भरभरुन आशिर्वाद द्यावे असे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.