Babajani Durani News : राष्ट्रवादीतील घरवापसीने दुर्राणी यांच्या 'बाबा' टॉवरची एसटी चौकशी थांबणार का?

Babajini Durrani rejoined Ajit Pawar's NCP just two months after leaving. : दुर्राणी यांनी 25 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकासह परिषदेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
ajit pawar- babajani durrani -sharad pawar News
ajit pawar- babajani durrani-sharad pawar Newssarkarnama
Published on
Updated on

Parbhani NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार पाथली येथील बाबाजानी दुर्राणी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 25 मार्च 2025 रोजी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. अजित पवारांची साथ सोडताच बाबाजानी दुर्राणी यांचे दिवस फिरले होते. पाथली नगरपालिकेच्या मालकीच्या बाबा टॉवर व्यापारी संकुल प्रकरणात दुर्राणी यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश महायुती सरकारने दिले होते. त्यावेळी अजित पवारांचा पक्ष सोडण्याचा फटका दुर्राणी यांना बसल्याची चर्चा परभणीसह पाथरी मतदार संघात होती.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटला तेव्हा मराठवाड्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी, माजी नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. कालांतराने मात्र अजित पवार राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झाले आणि मराठवाड्यातील हे चित्र हळूहळू बदलत गेले. मी मोठ्या साहेबांचाच असं छातीठोकपणे सांगणारे मराठवाड्यातील अनेक नेते अजित पवार यांच्यासोबत जाताना दिसले. त्यापैकीच एक होते बाबाजानी दुर्राणी. तसं पाहिलं तर अजित पवार यांच्याशी दुर्राणी यांचे फारसे कधी जमले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असताना अनेकदा अजित पवारांशी त्यांचे खटकेही उडाले. अगदी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाही दुर्राणी (Babajani Durani) यांनी दिला होता. मात्र राजकारणामध्ये परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात तसेच दुर्राणी यांच्या बाबतीतही घडले. मतदारसंघातील कामे आणि परभणी वसमतच्या विकासासाठी आपण अजित पवार यांच्या पक्षात जात आहोत, असं सांगत दुर्राणी यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. दरम्यान विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या कोटातून आपल्याला संधी मिळेल या आशेने दुर्राणी अजित पवार यांच्या पक्षात गेले होते.

ajit pawar- babajani durrani -sharad pawar News
Babajani Durani Met MLA Suresh Dhas : चोहोबाजूंनी कोंडी झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी सुरेश धस यांना भेटले!

मात्र अजित पवार यांनी त्यांना संधी नाकारत राजेश विटेकर यांना आमदार करण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला. त्यामुळे नाराज झालेल्या बाबाजानी दुर्राणी यांनी 25 मार्च रोजी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकाला केलेली मारहाण, पाथरी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यावर समर्थकांसह केलेला हल्ला या दोन प्रकरणात दुर्राणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय पाथरीतील त्यांच्या बाबा टॉवर या व्यापारी संकुलातील बेकायदेशीर बांधकामाची एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले.

ajit pawar- babajani durrani -sharad pawar News
Ajit Pawar : अजित पवारांच्या नेत्याची राजकीय खेळी?, चार माजी आमदारांच्या प्रवेशानंतर काँग्रेसच्या बंडखोर नेत्याच्या प्रवेशासाठीही फिल्डिंग

अजित पवार यांच्या पक्षाची साथ सोडल्यानंतर काही महिन्यातच ही एसआयटी चौकशी लागल्याने दुर्राणी अडचणीत सापडले होते. मतदार संघामध्ये वर्चस्व टिकवायचे असेल आणि नगर परिषदेत पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर विरोधी पक्षात राहून उपयोग नाही. तसेच एसआयटीसह दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून सहीसलामत सुटका करून घ्यायची, असेल तर अजित पवार यांच्यासोबत राहणेच हिताचे आहे हे लक्षात आल्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे दर ठोठावले आहे. परभणी आणि पाथरी मतदारसंघातील आपल्या समर्थकांची बैठक घेऊन येत्या आठ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय दुर्राणी यांनी घेतला आहे.

ajit pawar- babajani durrani -sharad pawar News
NCP political updates: मोठी बातमी! शरद पवारांना धक्का; बडा नेता करणार 'या' तारखेला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

बाबाजानी दुर्राणी यांच्या बाबा टॉवर व्यापारी संकुलाची एसआयटी चौकशी थांबेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच गेल्या वर्षभरात बाबाजानी दुर्राणी यांनी दोन-तीन वेळा तळ्यात मळ्यात करत पक्ष बदलल्याने ते किती गोंधळले आहेत? हे स्पष्ट होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता पाथरी नगर परिषदेतील सत्ता आणि आपले एकहाती वर्चस्व कायम राखण्यासाठी तसेच जिल्हा परिषदेत जास्तीत जास्त सदस्य सदस्य निवडून आणत आपला प्रभाव मतदार संघात टिकवून ठेवण्यासाठी दुर्राणी यांनी पुन्हा एकदा माघार घेत अजित पवार यांच्याशीच जुळवून घेण्याचे ठरवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com