NCP political updates: मोठी बातमी! शरद पवारांना धक्का; बडा नेता करणार 'या' तारखेला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Sharad Pawar News : शरद पवार गटाचा बडा नेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या 8 जूनला प्रवेश करणार आहे.
Ajit Pawar Shard Pawar
Ajit Pawar Shard PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाने सुरू केली आहे. स्थानिकच्या निवडणुका येत्या चार महिन्यात होणार असल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचा बडा नेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या 8 जूनला प्रवेश करणार आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार यांची साथ सोडणार आहेत. 8 जूनला ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश करणार आहेत. येत्या आठ तारखेला पाथरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Ajit Pawar Shard Pawar
BJP Politics : भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी प्रथमच महिलेला संधी, प्रज्ञा पाटलांवर विश्वास!

याबाबत रविवारी दुपारी पाथरीमध्ये बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

Ajit Pawar Shard Pawar
BJP Maharashtra politics : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवरून ‘नाराजीनाट्य’; महापालिका निवडणूक तोंडावर तरी मुंबईचा अध्यक्ष ठरेना !

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचाही अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा मुहूर्त ठरला आहे. १३ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते खामगाव येथे प्रवेश करणार आहेत. सानंदा हे खामगाव विधानसभा मतदारसंघात सलग १५ वर्ष आमदार होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची काँग्रेसमध्ये घुसमट सुरू होती.

Ajit Pawar Shard Pawar
Hagwane Family : सुनांचा छळ अन् पोलिसांची फसवणूक करणाऱ्या हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघडकीस, पुतण्याच्या चित्रपटासाठी थेट दिग्दर्शकाला...

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतून महायुतीकडे जाणाऱ्यांचा ओढा वाढला आहे. विशेषतः महायुतीमधील भाजपचा कोटा पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणत प्रवेश होत आहेत. गेल्या काही दिवसापासून थांबलेले प्रवेश सोहळे आता निवडणुकीची घोषणा होणार असल्याने पुन्हा सुरु झाले आहेत.

Ajit Pawar Shard Pawar
Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Case : पोलिसांना चकवा देण्यासाठी निलेश चव्हाणकडून मैत्रिणीचा वापर! तपासात नवी माहिती आली समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com