Maharashtra cabinet expansion : निलंगेकर-पवारांच्या भांडणात अहमदपूरच्या बाबासाहेब पाटलांना मंत्रीपदाची लाॅटरी!

Babasaheb Patil gets a chance to become a minister : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उदगीरचे विद्यमान आमदार माजीमंत्री संजय बनसोडे यांना झटका देत अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्री केले.
Babashaeb Patil Minsiter News
Babashaeb Patil Minsiter NewsSarkarnama
Published on
Updated on

रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर : महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी मोठी स्पर्धा होती. विशेषतः भाजपचे 132 आमदार निवडून (cabinet expansion) आल्यावर ही स्पर्धा अधिकच वाढली. लातूर जिल्ह्यात निलंग्याचे आमदार माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यात मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच होती. दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके असल्याने ते कोणाला झुकते माप देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

परंतु धक्का तंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपने आपल्याच आमदारांना धक्का देत जिल्ह्याचे मंत्रीपद मित्रपक्ष (NCP)राष्ट्रवादीसाठी सोडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उदगीरचे विद्यमान आमदार माजीमंत्री संजय बनसोडे यांना झटका देत अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांना मंत्री केले. त्यानंतर लातूर जिल्ह्यात निलंगेकर-पवारांच्या भांडणात मंत्रीपद अहमदपूरला गेले, अशी चर्चा सुरू झाली आहे. अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आणि इकडे शहरात त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलाल उधळला.

Babashaeb Patil Minsiter News
NCP Minister List : अजितदादांचा धक्कादायक निर्णय; भुजबळ, वळसे पाटील, आत्राम, बनसोडे, अनिल पाटलांचा मंत्रिपदाच्या यादीतून पत्ता कट

कला शाखेचे पदवीधर असलेले आमदार बाबासाहेब पाटील यांना समाजसेवा, आधुनिक शेती, वाचन व योगासनाचा छंद आहे. पाटील यांची राजकीय कारकीर्द 1985 मध्ये शिरूर ताजबंद येथील सोसायटीत बिनविरोध निवडून येऊन झाली. बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड येथे प्राधिकृत अधिकारी म्हणून काम केले आहे. जिल्हा परिषद सदस्यपदी पंधरा वर्षे कार्य करत असताना पाच वर्षांसाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

Babashaeb Patil Minsiter News
Ajit Pawar : शपथ घेण्याआधीच अजितदादांकडून भावी मंत्र्यांना झटका; अडीच-अडीच वर्षेच मिळणार संधी...

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग पाच वेळा संचालकपदी तर याच कालावधीत त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष पदही सांभाळले होते. बाबासाहेब पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले असून बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ व शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सचिव आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांनी संचालक म्हणूनही काम केले आहे.

Babashaeb Patil Minsiter News
Latur BJP News : लातूर जिल्ह्यात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा; निलंगेकर, पवार अन् कराडही रांगेत..

या शिवाय सहकार क्षेत्रात महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ज्येष्ठ संचालक म्हणून ते काम पाहत असून महेश नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून ते अप्रत्यक्ष काम पाहतात. बालपणापासून काका माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या सहवासात बाबासाहेब पाटील यांची जडणघडण झाली. घरातून त्यांना राजकीय वारसा लाभला. तीन वेळा आमदार व एक वेळा राज्यमंत्रिपदी काम केलेल्या बाळासाहेब जाधव यांनी बाबासाहेब पाटील यांना राजकारणाचे धडे दिले.

Babashaeb Patil Minsiter News
Mahayuti Cabinet : महायुतीच्या 39 आमदारांना मंत्रिमंडळात संधी; हे आहेत कॅबिनेट अन्‌ राज्यमंत्री!

तीन वेळा मिळाली संधी

वर्ष 2009 ते 2024 दरम्यान, बाबासाहेब पाटील यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही बाबासाहेब पाटील यांनी 32 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. विधानसभा मतदारसंघात केलेला विकास हा मुद्दा घेऊन निवडणूक लढवलेल्या बाबासाहेब पाटील यांचे भविष्यात मतदारसंघातील शैक्षणिक दर्जा सुधारणे व सिंचन वाढवण्यासाठी अंतेश्वर प्रकल्प पूर्णत्वाकडे घेऊन जाणे हे लक्ष्य असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com