Video Bachchu Kadu : बच्चू कडूंची सटकली! अधिकाऱ्याच्या कानाखालीच लगावली; नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar News : अपंग व्यक्तिंना दिलेल्या रिक्षा वाटपाच्या दिवशीच बंद पडल्याने बच्चू कडू यांना संताप अनावर झाला.
Bachchu Kadu
Bachchu KaduSararnama
Published on
Updated on

Maharashtra political News : माजी मंत्री बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली आहे. अपंगांना दिलेल्या रिक्षा बंद पडत असल्यावरून कडूंनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यावेळी कडू यांनी अधिकारी आणि रिक्षा कंपनीच्या मालकाला मारल्याचा प्रकार घडला. आता या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील काही दिव्यांग व्यक्तिंना ई-रिक्षाचे वाटप करण्यात आले होते. या रिक्षाच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, हा शासनाचा हेतू आहे. मात्र ज्या दिवशी वाटप करण्यात आले त्याच दिवशी रिक्षा बंद पडल्या. या बंद पडलेल्या काही रिक्षांना इतर वाहनांच्या मदतीने घरी घेऊन जावे लागले. परिणामी दिव्यांग व्यक्तिंना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

बच्चू कडू Bachchu Kadu गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी संबंधित आधिकारी आणि रिक्षा कंपनीचे मालकही विश्रामगृहात पोहचले होते. दिव्यांग व्यक्तिंनी झालेला प्रकार कडूंना सांगितला. बंद पडलेल्या रिक्षांमुळे मनस्तापाला समोरे जावे लागल्याचे सांगितले. या प्रकाराने बच्चू कडू संतप्त झाले होते. त्यातून त्यांनी संबंधित आधिकाऱ्याला चापट मारली.

Bachchu Kadu
Pune MVA : पुण्यातील आठ जागांसाठी महाविकास आघाडीत 'टशन'! कुणाचं काय म्हणणं?

बच्चू कडूंनी अधिकाऱ्याला झापडल्यानंतर दिव्यांग व्यक्तिने नेमके काय घडले याची माहिती दिली. मिळालेली रिक्षा वारंवार पटली होते. यामुळे प्रवाशांना स्वतःच्या खिशातूनच पैसे देण्याची वेळ आली. चढावर या रिक्षा चढत नाहीत. या रिक्षा चर्जींगमध्ये किती किलोमीटर जातात याची माहिती नाही. रिक्षाच्या बॅटरीची क्षमता किती, हे समजत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची व्यथा दिव्यांगांनी कडूसमोर मांडली.

Bachchu Kadu
Latur BJP Politics : धीरज देशमुखांच्या विरोधात उमेदवार अन् कव्हेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com