Latur BJP Politics : धीरज देशमुखांच्या विरोधात उमेदवार अन् कव्हेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट..

Former BJP MLA met Raj Thackeray : राज ठाकरे यांनी आपल्या लातूर दौऱ्यात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. पण उमेदवार फक्त धीरज देशमुख यांच्या लातूर ग्रामीण मतदारसंघातच घोषित केला. इतर मतदारसंघात मनसे उमेदवार देणार का?
EX.MLA Shivaji Patil Kavhekar-Raj Thackraey
EX.MLA Shivaji Patil Kavhekar-Raj ThackraeySarkarnama
Published on
Updated on

Latur Rural Constituency News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात वेगवान राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा लातूर दौरा चांगलाच चर्चेत आला तो त्यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजवी व विद्यमान लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांच्याविरोधात उमेदवार घोषित केल्यामुळे.

संतोष नागरगोजे यांची उमेदवारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल जाहीर केली आणि त्यानंतर काही वेळातच भाजपचे माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नव्हती जिल्ह्यातील सिंचन, शेतीसह विविध विकास कामांवर चर्चेसाठी ती होती, असे कव्हेकर सांगत आहेत.

असे असली तरी मनसेचा उमेदवार तो ही लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून जाहीर झाल्यानंतर कव्हेकरांनी घेतलेली राज ठाकरे यांची भेट अराजकीय असू शकेल यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नाही. दिवंगत विलासराव देशमुख यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केल्यामुळे शिवाजी पाटील कव्हेकर चर्चेत आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पुन्हा काँग्रेस आणि आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

EX.MLA Shivaji Patil Kavhekar-Raj Thackraey
Raj Thackeray : अशी पडली राज ठाकरेंच्या बंडाची ठिणगी

राज ठाकरे यांनी आपल्या लातूर दौऱ्यात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. पण उमेदवार फक्त धीरज देशमुख यांच्या (Latur) लातूर ग्रामीण मतदारसंघातच घोषित केला. इतर मतदारसंघात मनसे उमेदवार देणार का? याकडे आता सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये शिवाजी पाटील कव्हेकर आपल्या समर्थकांसह राज ठाकरेंना जाऊन भेटल्याने उमेदवारीचा शब्द दिला तर ते मनसेत प्रवेश करतात की काय? अशी चर्चा लातूर जिल्ह्यात सुरू झाली आहे.

2019 मध्ये मोठ्या आशेने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इतर पक्षातील आमदार, पदाधिकाऱ्यांना या राष्ट्रीय पक्षात फार महत्व दिले गेले नाही. नांदेड जिल्ह्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माधव किन्हाळकर यांनी पक्षात आपल्याला किमंतच नव्हती सांगत नुकताच दुसरा पर्याय निवडला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असे मान न मिळालेले अनेक नेते इकडून तिकडे उड्या मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

EX.MLA Shivaji Patil Kavhekar-Raj Thackraey
Latur MNS News : मराठवाड्यात मनसेचा पहिला उमेदवार जाहीर.. संतोष नागरगोजे लातूर ग्रामीणमधून मैदानात..

शिवाजी पाटील कव्हेकर यांची भाजपमध्ये काही वेगळी अवस्था नाही. अंतर्गत गटबाजी, डावलले जात असल्याच्या तक्रारीचा सूर कव्हेकर समर्थकांकडून अधूनमधून निघत असतो. अशावेळी मनसे सारख्या पक्षाकडून विधानसभा उमेदवारीचा शब्द मिळतो का? याची चाचपणी तर कव्हेकरांनी राज ठाकरे यांच्या भेटीत केली नाही ना? अशी चर्चा होताना दिसते आहे.

कव्हेकर यांच्यासारखा अनुभवी चेहरा पक्षात आला तर मनसेला जिल्ह्यात विस्तार करण्यास मदतच होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या भेटीचे `राज` उलगडतील. शिवाजीराव पाटील कव्हेकर हे 1995-1999 दरम्यान जनता दलाचे आमदार होते. त्यांनी लातूरमधून विलासराव देशमुख यांचा तीस हजार मतांनी पराभव केला होता.

EX.MLA Shivaji Patil Kavhekar-Raj Thackraey
Marathwada Politics : महाराष्ट्राच्या सत्तेची वाट मराठवाड्यातून; असं असणार विधानसभेचं गणित...

नंतर 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली आणि विधानसभा निवडणुक लढवली. नंतर कव्हेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर कव्हेकर यांनी पुन्हा 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com