Marathwada : भाजपचे विद्यमान आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. (Bagde-kale News) काही दिवसांपुर्वी बागडे फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयात सिंचन विहिरीच्या फायली मंजुर करण्यासाठी आठ तास ठिय्या देत बसले होते. यावरून कल्याण काळे यांनी त्यांच्यावर चार वर्षात फायली मंजुर होत नसतील तर राजीनामा द्या, अशी टीका केली होती.
त्याला मी जनतेच्या कामासाठी दिवसभर बसायला तयार आहे, तुम्ही तर कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी मंत्र्यांकडे जावून बसला होतात, असा पलटवार केला होता. त्यानंतर हे आरोप-प्रत्यारोप थांबतील असे वाटत असतांना कल्याण काळे (Congress) यांनी बागडेंवर थेट भ्रष्टाचाराचा आरोप करत त्यांच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी करण्याची मागणी केली.
बागडे (Haribhau Bagde) राजकारणात आले तेव्हा त्यांच्याकडे साधी मोटारसायकल नव्हती. आज मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरात बंगले, चारचाकी गाड्या आहेत. स्वतःच्या मालकीचा साखर कारखाना देखील आहे. (Marathwada) मग मी कधी एक रुपयाही खाल्ला नाही म्हणणाऱ्या बागडेंकडे एवढी संपत्ती आली कुठून?असा सवाल काळे यांनी उपस्थितीत केला. कन्नड येथील संपर्क अभियाना दरम्यान, पत्रकार परिषदेत त्यांनी बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
मी पहिल्यापासून श्रीमंत आहे, माझ्या वडिलांनी बंगला बांधून ठेवला, मी चारचाकीतून आधीपासूनच फिरतो. मग तुम्ही भ्रष्टाचार केला नाही, पाप केले नाही म्हणता, मग तुमच्याकडे मोटारसायकल नव्हती, तुम्ही पायी चालत होता तर आज एवढी संपत्ती आली कुठून? असा प्रश्न देखील काळे यांनी बागडेंना केला. आता यावर बागडेंकडून काय प्रत्युत्तर दिले जाते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.